Harshwardhan Sapkal on RSS : 'संघ दहा तोंडाचा...' हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा डागली तोफ

Harshwardhan Sapkal on RSS :दसऱ्याच्या दिवशी प्रतिगामी विचारांचे दहन करण्याचे आवाहन करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आरएसएसवर टीका केली. या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Harshwardhan Sapkal | Maharashtra municipal elections 2025
Harshwardhan Sapkal | Maharashtra municipal elections 2025Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघभूमीतून त्यांनी थेट संघालाच ललकारले आहे. संघ रावणाप्रमाणे दहा तोंडाचा आहे. विजयादशमीच्या दिवशी रावण नावाच्या व्यक्तीचे नव्हे तर प्रवृत्तीचे दहन केले जाते. येत्या दसऱ्याच्या दिवशी सर्व प्रतिगामी तोंडाचाही दहन करावे असे आवाहन करून सपकाळ यांनी संघावर तोफ डागली. यावरून आता मोठा वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांच्या दीक्षाभूमी ते वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या यात्रेत सपकाळ यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष तसेच आमदार विकास ठाकरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक आदी सहभागी झाले होते. यावर सपकाळ यांनी संविधानाला अपेक्षित असणाऱ्या भारतासाठी सर्वांनी या यात्रेस सहभागी होण्याचे आवाहन केले.

विशेष म्हणजे शनिवारी संघाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले आहे. पथसंचलनादरम्यान स्वयंसेवकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावरही सपकाळ यांनी आता संघाने गोडसे आणि मनुस्मृतीला तिलांजली द्यावी आणि महात्मा गांधी यांचे अनुसरून संविधानाचा स्वीकार करावा असा टोला लगावला होता.

Harshwardhan Sapkal | Maharashtra municipal elections 2025
Navi Mumbai politics : नवी मुंबईत पवारांना मोठा धक्का; शिंदेंनी बड्या नेत्याला लावलं गळाला

आज गांधी विचार देशाचे वर्तमान आणि भविष्य आहे. संविधानाने भारत संरक्षणासाठी आम्ही भूमिका घेऊन चाललो आहे. संविधान संकटात आले आहे. भारतीय नागरिक सहभागी होत आहे. संघाला १०० वर्ष होत आहे. गांधी विचार हा विश्वव्यापी झालेला आहे. त्यामुळे दोन ऑक्टोबरला हा विचार सगळ्यांनी समजून घ्यावा असेही सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal | Maharashtra municipal elections 2025
Sonam Wangchuk : 'पंतप्रधानांनी युनूस यांना भेटणं योग्य असेल तर...' सोनम वांगचुकच्या यांच्या पत्नी काय म्हणाल्या?

हर्षवर्धन सपकाळ सातत्याने संघावर तोफ डागत आहे. तसेच संविधान धोक्यात असल्याचा वारंवार उल्लेख करीत आहेत. हे बघता आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस महाविकास आघाडी पुन्हा एकदा संविधान खतरे मे हा मुद्दा घेऊन समोर येणार असल्याचे स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com