Charan Waghmare यांना उच्च न्यायालयाचा दणका, उपाध्यक्षांवर अपात्रतेची टांगती तलवार..

ZP उपाध्यक्ष संदीप टाले यांच्यासह तिघांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
Charan Waghmare and Sandeep Tale, Bhandara
Charan Waghmare and Sandeep Tale, BhandaraSarkarnama
Published on
Updated on

Bhandara BJP News : भारतीय जनता पक्षातून निष्कासीत झालेले माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली नाही. वाघमारेंना उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाने चांगलाच दणका दिला आहे. चरण वाघमारे गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले यांच्यासह तिघांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

जिल्हा परिषद (ZP) सदस्य उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांची पक्षांतर बंदी कायद्यानुसार होणारी कारवाई भंडारा (Bhandara) जिल्हाधिकाऱ्यांकडे न होण्याची याचिका उच्च न्यायालयाच्या (High Court) नागपूर (Nagpur) खंडपीठाने खारीज केली असून आता या तिघांच्या अपात्रतेची सुनावणी भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या न्यायालयात होणार आहे. संदीप टाले, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांच्यावर अपात्रतेची तलवार लटकली आहे. दरम्यान एका महिन्यात यांची सुनावणी होणार आहे.

तिघेही लवकरच अपात्र होण्याची दाट शक्यता या घडामोडींमुळे निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेत या तीन क्षेत्रांसाठी लवकरच जिल्हावासीयांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार असं दिसतंय.

दरम्यान याचा थेट परिणाम जिल्हा परिषदेवर होणार असून सत्ता वाचविण्यासाठी चरण वाघमारे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित. ५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत १० मे २०२२ला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक झाली होती.

कॉंग्रेसच्या २१ सदस्यांनी भाजपमधून निष्कासीत करण्यात आलेले चरण वाघमारे यांच्या ६ सदस्यांसोबत मिळून (भाजप ५+१ अपक्ष) सत्ता स्थापन केली. यात कॉंग्रेसचे गंगाधर जिभकाटे अध्यक्ष बनले आणि चरण वाघमारे गटाचे संदीप टाले उपाध्यक्ष झाले.

यावेळी भाजपचे जिल्हा परिषद गटनेते विनोद बांते यांचा व्हिप झुगारून भाजपच्या ५ सदस्यांनी कॉंग्रेसला समर्थन दिले. याबाबत भाजपने तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडे तक्रार करत पक्षाशी बंड करणाऱ्या पाचही जिल्हा परिषद सदस्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली.

Charan Waghmare and Sandeep Tale, Bhandara
Bhandara : आता पेटतोय महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद, भंडारा जिल्ह्यातील लोक होताहेत आक्रमक...

कालांतराने चरण वाघमारे गटातील २ सदस्य पुन्हा वाघमारे यांची साथ सोडत भाजपवासी झाले. दरम्यान चरण वाघमारे गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले, उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भंडारा जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात अपात्रतेची सुनावणी होऊ नये, यासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांची ही याचिका फेटाळली आहे. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात ही कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट करत चरण वाघमारे गटाला जबर धक्का दिला आहे.

आता संदीप टाले, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील व परिषद सदस्य द्रुपदा मेहर या तिघांच्या अपात्रतेची सुनावणी भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या कोर्टात होणार असून संदीप टाले, उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांच्यावर अपात्रतेची तलवार लटकली आहे. दरम्यान एका महिन्यात यांची सुनावणी होणार असून तिघेही लवकरच अपात्र होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेत संदीप टाले यांच्या गर्रा बघेडा, उमेश पाटील यांच्या आंधळगाव आणि दुप्रदा मेहर यांच्या आंबागड जिल्हा परिषद क्षेत्रांत लवकरच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. अवघ्या ९ महिन्यांत चरण वाघमारे यांचे स्वप्न भंग झाले, असे म्हणायला काही हरकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com