राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर तिरंगा लावा, अन्यथा आंदोलन करू...

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सरकारचे वैचारिक नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सातत्याने तिरंग्याचा तिरस्कारच केलेला आहे.
Kapil Dhoke Criticism on bjp
Kapil Dhoke Criticism on bjpSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राबविण्याचा संकल्प केला आहे. देशातील नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा (Tiranga) फडकवण्याचं आवाहन केले आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर अद्याप तिरंगा का फडकला नाही, असा सवाल महाराष्ट्र युवक कॉंग्रेस (Congress) कमिटीचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके यांनी केला आहे.

या अभियानाबाबत कपिल ढोके म्हणतात, या देशातील प्रत्येक नागरिकाने सातत्याने तिरंग्याचा सन्मानच केलेला आहे. गरिबांपासून श्रीमतापर्यंत आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच नेहमी तिरंग्याचा अभिमान बाळगला आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सरकारचे वैचारिक नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सातत्याने तिरंग्याचा तिरस्कारच केलेला आहे, तिरंग्याला विरोध केला आहे. स्वातंत्र्य मिळाल्याला ७५ वर्ष पूर्ण झाली. पण संघाच्या मुख्यालयावर (RSS headquarters) अद्यापही तिरंगा फडकलेला नाही.

हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हे देशवासीयांना सांगण्यासोबत संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावण्याची हिंमत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवतील का, या प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. हाच प्रश्‍न महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून आमचा आहे, असे ढोके म्हणाले. मोदीजींनी येत्या १५ ऑगस्टला संघ मुख्यालयावर तिरंगा फडकावून दाखवावा, तर त्यांची तिरंग्याप्रति असलेली भावना खरी आहे, असे आम्ही समजू. अन्यथा मोदीजी तिरंग्याचे बाजारीकरण करीत आहेत, हा देशवासीयांचा समज पक्का होईल, असेही ते म्हणाले.

Kapil Dhoke Criticism on bjp
युवक काॅंग्रेस बळकटीकरणासाठी आमदार झनक यांचा झंजावात

भाजप तिरंग्याच्या नावावर भावनिक राजकारण करत आहे. मोदींनी आरएसएसच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवण्याची हिंमत दाखवली तरच "हर घर तिरंगा" ह्या मोहिमेचा उद्देश प्रांजळ असेल अन्यथा नाही. देशभरातून ही मागणी होत असल्यामुळे यावेळी संघ मुख्यालयावर तिरंगा फडकेल, अशी आशा आहे. राजकीय जाणकारांमध्येही तशी चर्चा आहे. पण जर का भाजपने यावेळी संघ मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही, तर महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल, असा इशारा कपिल ढोके यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com