MLA Mother Sells Baskets: किती हा साधेपणा! मुलगा आमदार असतानाही आई विकतेय बांबूच्या टोपल्या

Kishor Jorgewar Mother : मुलगा आमदार असतानाही आईची व्यावसायासाठी धडपड
Kishor Jorgewar Mother
Kishor Jorgewar Mother Sarkarnama

Chandrapur News : आमदार, खासदार म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर चित्र येतं ते बंगला, पैसा, सुरक्षा. पण आजही काही आमदार असे आहेत की त्यांचे कुटुंबीय अगदी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राहतात. असंच एक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मुलगा आमदार असूनही आई रस्त्यावर बसून बांबूच्या टोपल्या विकत आहे. आता हे तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं आहे. गंगुबाई जोरगेवार या मंदिराबाहेर बसून टोपल्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्या चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री आहेत.

Kishor Jorgewar Mother
Ashish Deshmukh Join Ncp : काँग्रेसमधील कोंडीमुळे आशिष देशमुख घड्याळाचा हात धरणार?

गेल्या पन्नास वर्षांपासून गंगुबाई अर्थात अम्मा जोरगेवार या बांबूपासून बनवलेल्या टोपल्या विकण्याचं काम करतात. वयाच्या 80 व्या वर्षी देखील गंगुबाई जोरगेवार या आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ आहेत. त्यांचा मुलगा किशोर जोरगेवार हे सध्या आमदार आहेत. पण तरी देखील त्या टोपल्या विकण्याचं काम करतात.

त्यांचा हा साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुलगा आमदार असतानाही गंगूबाई जोरगेवार यांची व्यावसायिक धडपड सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, कष्टाने समाधान मिळत असेल तर आनंदच आहे. त्यात काय लाजायचं?, अशी प्रतिक्रिया गंगुबाई जोरगेवार यांनी दिली.

Kishor Jorgewar Mother
BJP-NCP Politics: निष्क्रियतेचा भोपळा फुटला म्हणणाऱ्या मुळीकांनी आमदारकी फुकट घालवली; टिंगरेंचा हल्लाबोल !

दरम्यान, मुलगा आमदार आहे, सुखात घरी बसून राहायचे दिवस आहेत. मात्र, तरी देखील गंगूबाई या बांबू ताटवे, टोपल्या विकण्याचा पिढीजात व्यवसाय करत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधीचे कुटुंब कसे असावे, याचं जोरगेवार हे कुटुंब आदर्श उदाहरण आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com