Maratha Morcha : अकोल्यातील शेकडो मराठाबांधव जरांगे-पाटलांच्या मोर्चासाठी होणार रवाना !

Jarange Patil : जिल्ह्यातील मराठ्यांना केले सहभागी होण्याचे आवाहन.
Maratha protestors Akola
Maratha protestors AkolaSarkarnama
Published on
Updated on

मराठा आरक्षणासाठी ही आता आरपारची लढाई असेल, असे म्हणत मनोज जरांगे-पाटील लाखो मराठाबांधवांसह मुंबईकडे कूच करीत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी लाखोंचा जनसमुदाय 26 जानेवारीला मुंबईत धडकणार आहे, तर या आंदोलनात राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठाबांधव सहभागी होताना दिसत आहेत.

अकोल्यातूनही गरजवंत सकल मराठा समाजाचे शेकडो बांधव उद्या (ता. 25 जानेवारी) अकोल्यातून मुंबईत जाण्यासाठी रवाना होणार आहेत. सहभागी होण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन आता मुंबईत असणार आहे.

Maratha protestors Akola
Akola Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीत उफाळून आला पुन्हा गटबाजीचा वाद!

यापूर्वी जरांगे-पाटील यांनी राज्यात विविध ठिकाणी सभा घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. अकोल्यातही मराठा समाजाच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेनंतर अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे आमरण उपोषण करण्यात आले. दरम्यान, आता जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार असल्याने अकोला येथील सकल गरजवंत मराठा समाजबांधवांनी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोल्यातील गरजवंत मराठा गुरुवारी (ता. 25 जानेवारी) सकाळी 9 नऊ वाजता अकोल्यातील पातूर येथून निघणार आहेत. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी पातूर येथे वेळेत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीने सरकार बॅकफूटवर आले आहे. जरांगे-पाटील यांना समर्थन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठाबांधव एकवटत आहेत.

प्रत्येक गावाच्या वेशीवर मराठाबांधवांनी यावे आणि आंदोलनाला पाठिंबा द्यावा, याचसाठी अकोला जिल्ह्यातील हजारो मराठाबांधव सराटीला पोहोचून जरांगे-पाटील यांच्यासोबत आंदोलनातील हिस्सा बनलेले आहेत, तर आजही हजारो बांधव 2 महिन्यांच्या मुक्कामाच्या व्यवस्थेने निघत आहेत, अशीही माहिती मराठा समाजबांधवांनी दिली. यावेळी राजेश देशमुख, दादाराव पाथ्रीकर, श्रीकांत देशमुख, प्रमोद धरमाळे, गजानन हरणे, मंगेश काळे, पंकज जायले, शैलेश देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Edited By : Atul Mehere

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com