Hit and Run : आंदोलनाचा भडका उडणार? ; मध्यरात्रीपासून चालक 'स्टिअरिंग' सोडणार!

Akola Drivers Association : अकोला जिल्हा मोटार चालक/ मालक संघटनेने पत्रकारपरिषदेत दिली माहिती!
Akola Drivers Association
Akola Drivers AssociationSarkarnama
Published on
Updated on

Akola News : भारतीय न्यायिक संहिता २०२३ मधील वाहनचालकांना कठोर शिक्षेच्या तरतुदीविरोधात देशभरातील वाहतूकदार आणि ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा केल्यानंतर आता पून्हा या आंदोलनाचा भडका उडणार असल्याचं दिसत आहे.

कारण, मंगळवारी मध्यरात्रीपासून हे आंदोलन करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील मोटार चालक/ मालक संघटनेने हा इशारा अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

देशाच्या विविध भागात दौरा करून आज (9 जानेवारी) मध्यरात्रीपासून हिट अँड रन प्रकरणी आंदोलन अधिक तीव्रआंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्रमध्ये घेण्यात आला असून, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये अकोला(Akola) जिल्ह्यातील अकोला जिल्हा मोटार मालक/वाहक असोसिएशन अध्यक्ष जावेद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akola Drivers Association
Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाकडून 'हा' दावा!

संघटनेने म्हटले आहे की, 'देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन सुरू आहे. परंतु सरकार मात्र भूमिकेवरती ठाम आहे. केंद्र सरकारने(Central Govt) देशभरातील 25 कोटी चालकांच्या संघटनांसोबत चर्चा करावी, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये.

आजपासून आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येत असुन शांततेच्या तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा व कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन होणार नाही.'

याचबरोबर 'शांततेच्या मार्गाने परंतु अधिक आक्रमक व तीव्र आंदोलन होणार आहे. आज मध्यरात्रीपासून चालक 'स्टिअरिंग' सोडणार आहेत. तसेच चक्काजाम देखील करण्याची तयारी आपण केली आहे. त्यासाठी जिल्हयातील चालक/मालकांनी सहभागी व्हावे.' असे आवाहन अकोला जिल्ह्यातील सर्व चालक मालकांनी केले आहे. यावेळी अकोला जिल्हा मोटार मालक/वाहक असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खान पठाण , शहर अध्यक्ष गुड्डू सेठ, अकोला ड्रायव्हर असोसिएशन अध्यक्ष सैयद वसीम सह आदींची उपस्थिती होती.

Akola Drivers Association
Sunil Kedar : सुनील केदार यांना मोठा दिलासा! उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नव्या कायद्यामुळे ट्रकचालक, खासगी बसचालक मोठ्या संख्येने नोकऱ्या सोडत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अपघात झाल्यानंतर चालक किंवा त्याच्या मालकाने अपघाताची माहिती दिली, तर त्याला हा कायदा लागू होऊ नये, यासाठी सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

हिट अँड रन प्रकरणी दिल्ली पंजाब बिहार उत्तर प्रदेश मध्यप्रदेश सह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय झाला असून, महाराष्ट्रामध्ये देखील हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून 9 जानेवारीमध्ये रात्रीपासून हे आंदोलन तीव्र करून चक्काजाम करण्याचा निर्णय विविध संघटनेने घेतला असल्याची माहिती ऑटो टॅक्सी ट्रक ट्रान्सपोर्ट फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.

देशाच्या विविध भागात दौरा करून आज (9 जानेवारी) मध्यरात्रीपासून हिट अँड रन प्रकरणी आंदोलन अधिक तीव्रआंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्रमध्ये घेण्यात आला असून, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्हा मोटार मालक/वाहक असोसिएशन अध्यक्ष जावेद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बाबा कांबळे यांनी दिल्ली जंतर-मंतर येथे आंदोलन केले तसेच पंजाब येथील आंदोलनात देखील सहभाग घेतला तसेच देशाच्या विविध भागात दौरा करून ते 9 तारखेला महाराष्ट्र मध्ये पोहोचत आहेत 9 तारखेला मध्यरात्रीपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्र मध्ये घेण्यात आला असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केला जाणार आहे यामध्ये ऑटो टॅक्सी ट्रक बस टेम्पो सर्व प्रकारचे ड्रायव्हर चालक-मालक सहभागी होणार आहेत,

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com