नागपूर : एनसीएचे समीर वानखेडे यांच्यावरून सुरू झालेला देवेंद्र फडणवीस आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद लवंगी फटाक्यांवरून आता बॉम्ब फोडण्यापर्यंत आला आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या अंडरवर्ल्डच्या लोकांशी मलिकांचे थेट संबंध असल्याचा बॉंबगोळा आज फडणवीसांनी टाकला. त्याच काळात स्व. आर. आर. पाटील यांचे गुन्हेगारांसोबतचे फोटो मिडियाने छापले होते, पण आर. आर. पाटलांचा त्यात काही दोष नव्हता, असे फडणवीस यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
फडणवीस म्हणाले, आर. आर. पाटील इफ्तार पाटीला गेले होते आणि त्याच पार्टीतील गुन्हेगारांसोबतचे त्यांचे फोटो मिडीयाने छापले होते. तो सलीम पटेल होता, हा दाऊचा माणूस आहे. फराज मलिक नवाब मलिकांचे सुपुत्र आहेत आणि कुर्ल्यातील जमीन खरेदी-विक्री प्रकरणात त्यांचा थेट संबंध आहे. त्यांचे संबंध १९९३ मध्ये होते की पूर्वीपासूनचे आहे, हे तपासात उघड होणारच आहे. २०१९ च्या सुरुवातीला या प्रकरणातून फराज रिटायर्ड झाले आणि नवाब मलिक आले. त्यानंतर नवाब गेले त्यांचे भाऊ आले. कुर्ल्याची जमीन भाड्याने दिले, ते ॲग्रीमेंट फराज मलिकांच्या नावाने आहे.
मला जशी ही माहिती मिळाली तशीच आज माध्यमांपुढे आणली आहे. ते लोक जनतेला भटकवत आहेत. वार झाल्यावर मिडियाच्या माध्यमातून ते वार डायव्हर्ट कसे करायचे हे जसे त्यांना माहिती आले, तर आम्हालाही माहिती आहे. मुंबई स्फोटाचे आरोपी सरदार खान होते. त्यांच्यासोबत मलिकांनी जमिनीचे व्यवहार केले, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. तुमच्या पत्रकार परिषदेच्या आधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सिल्वर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, त्या भेटीला पत्रकार परिषदेचे पार्श्वभूमी आहे का, असे विचारल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना नेत्यांची बैठक यासंदर्भात झाली नसावी, असं मला वाटत असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
कुर्ला जमीन खरेदी-विक्री प्रकरणात सलीम पटेल यांच्या खात्यात १५ लाख रुपये गेले. खाते क्रमांकही फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सादर केला. १० लाख रुपये शहाव अली खान यांना भेटले यांनाच सरदार खान असं संबोधतात. मो. सलीमची १५ लाखाची रिसीप्ट आहे. सरदार खानची ५ लाखाची रिसीप्ट आहे. ५ लाख नंतर देऊ, असे तेव्हा लिहून ठेवण्यात आले आहे. रजिस्ट्री करताना फेक टेनंट दाखविला आहे. पॉवर ऑफ अटर्नीमध्ये वेगळा आणि रजिस्ट्रीमध्ये वेगळा व्यक्ती आहे.
ॲडज्युडीकेशनमध्ये २०५२ चा भाव असताना २५ रुपये चौरस फुटाच्या भावाने जमीन खरेदी करण्यात आली. २००३ मध्ये सौदा सुरू झाला व तो २००५ मध्ये संपला. तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. जस्टीस सावंतच्या आरोपांमुळे तेव्हा मलिकांना पद सोडावे लागले होते. मुंबईच्या गुन्हेगारांकडून मलिकांनी जमीन का खरेदी केली? त्यांनी ३ एकराची जागा मलिकांना केवळ २० लाख रुपयांत कशी देण्यात आली? त्यांच्यावर टाडा लागला होता आणि टाडाच्या कायद्यात त्या आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे प्रावधान आहे. ती जमीन जप्त होऊ नये, म्हणून मलिकांना ट्रान्सफर केली का, असे गंभीर प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले. या सर्व व्यवहारामध्ये येवढी उथलपुथल आहे की, संपूर्ण माहिती सांगितली तर जनता हैराण होईल, असेही ते म्हणाले.
२००५, २०११ आणि त्यानंतरचीही प्रकरणं मी बाहेर काढणार आहे. एकूण ५ प्रकरण उघडकीस आणणार आहे. मलिकांसोबत माझे वैयक्तिक वैर नाही. पण त्यांच्या पक्ष प्रमुखांनी त्यांच्यावर कारवाई करावी. त्या चार प्रॉपर्टीचे तपशील तपास यंत्रणांना देणार आहे. लिगल एक्सपर्टंसशी बोलून ठरवणार की पुरावे कुणाला दयायचे. या टर्मला मलिक मंत्री झाल्यानंतरचे यातील व्यवहार नाहीत आणि माझ्यासाठी हा राजकीय स्कोरींगचा विषय नाही. तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर विषय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपालांनाही पुरावे देणार आहे, असल्याचे फडणवीस म्हणाले. भाजपशी माझी लढाई नाही, असे मलिकांनी म्हटल्याचे सांगत. आमची पण मलिकांशी लढाई नाही, असे ते म्हणाले. कम्बोज यांच्याबद्दल विचारले असता, दीड वर्षांपूर्वी कम्बोज यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मानहानीचा दावा केला आहे. त्यानंतर मलिकांना नोटीस गेली आहे. मलिकांनी त्यांचे म्हणणे मांडावे. नेत्यांकडे मांडावे, न्यायालयात मांडावे, असा सल्लाही त्यांनी दिला
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.