धक्कादायक: पुराच्या पाण्यात २० प्रवाशांसह वाहून गेली एसटी

गुलाब चक्रीवादळामुळे हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अलर्ट दिला होता.
Yavatmal
Yavatmal Sarkarnama
Published on
Updated on

संजय राठोड

यवतमाळ : नांदेडवरून (nanded) नागपुरला (Nagpur) पुसद (Pusad) मार्गे निघालेली नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली आहे. सकाळी साडेसात ते आठ च्या सुमारास ही घटना घडली. एमएच १४ बीटी ५०१८ या क्रमांकाच्या एसटी बसमध्ये वीस प्रवासी होते. उमरखेड (Umarkhed) जवळून दोन किमी अंतरावर असलेला पुसद मार्गावरील दहागांव नाल्यात हिरकणी बस पुराच्या पाण्यात गेली वाहुन गेल्याची माहिती मिळाली आहे.

Yavatmal
अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला

गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Hurricane) हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) अलर्ट दिला होता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने नद्या नाले तुडूंब भरुन गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुसदमध्ये मुसळधार पाऊस सुरु असताना एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न केला.

सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान नांदेडहून नागपूरला पुसदमार्गे निघाली होती. मात्र उमरखेडपासून दोन किमी दहांगाव नाला पार करताना बस पुराच्या पाण्यात बस वाहून जाऊ लागली. चालकाने पाण्यातून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. या एसटीतील एका प्रवाशाला वाचवण्यात यश आलं आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच, उमरखेड तहसीलदार ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले . स्थानिक नागरिक व बचाव पथकांच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बस एका झाडाला अडकल्यामुळे प्रवासी बसच्या टपावर तर काहीजण झाडावर चढले आहेत. या अपघातातील प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com