INDIA Alliance Meeting : ‘इंडिया’ आघाडीसाठी वंचित इच्छुक; पण निमंत्रणच नाही, तर कसे जाणार?

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.
Prakash Ambedkar - Vanchit Bahujan Aghadi.
Prakash Ambedkar - Vanchit Bahujan Aghadi.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : मुंबई येथे ‘इंडिया’ची बैठक आज आणि उद्या होत आहे. २८ राजकीय पक्ष, सहा मुख्यमंत्री आणि ६३ नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रण आले नाही. (Vanchit has not been invited to India Aghadi)

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीचे निमंत्रण आलेले नाही. निमंत्रण नसल्यामुळे आम्ही बैठकीत सहभागी होऊ शकत नाही, हे पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आल्याचे वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीबाबत (Vanchit Bahujan Aghadi) लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. हा जुनाच रटाळ खेळ आहे. आम्ही बैठकीत सहभागी होण्यास इच्छुक आहोत. मात्र, निमंत्रणच मिळाले नाही तर सहभागी कसे होणार, ही वस्तुस्थिती असल्याचे डॉ. पुंडकर म्हणाले.

इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या या बैठकीतील सहभागाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी बैठकीत सहभागी होण्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगून, अद्याप कुणाचेही निमंत्रण नाही. निमंत्रण मिळाल्यास बैठकीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Prakash Ambedkar - Vanchit Bahujan Aghadi.
Vanchit Bahujan Alliance News : ...आणि म्हणून 'वंचित'ने कृषी अधिकाऱ्यांना गाडीवर बसून फिरवले !

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर, असे दोन दिवस होत आहे. या बैठकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सहभागी होत आहेत. त्याच वेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीतील उपस्थितीबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. या बैठकीबाबत वंचित सावध भूमिका घेत असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेसोबत आघाडी असल्याने बैठकीत सहभागी होण्याबाबत शिवसेनेकडून निमंत्रण मिळणे अपेक्षित होते. मात्र, बैठकीतील वंचितच्या सहभागाबाबत शिवसेनेकडूनही कोणतीच भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. कोणत्याही पक्ष किंवा नेत्याकडून बैठकीत उपस्थित राहण्याबाबत संपर्क साधण्यात आला नसल्याचेही नसल्याचेही रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com