INDIA Alliance News : इंडिया आघाडीतून नितीश का पळाले? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितले !

Ambedkar And Gandhi : आंबेडकरांपेक्षा राहुल गांधी जास्त आशावादी.
Rahul Gandhi and Nitish Kumar
Rahul Gandhi and Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

INDIA Alliance News : महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी शेवटच्या घटका मोजत असल्याचे सांगितले. त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांचीही फारकत झाल्याची माहिती दिली. महाविकास आघाडीची इंडिया आघाडी करायची नाही, असे आंबेडकर म्हणाले. असे असताना राहुल गांधी यांनी इंडिया आघाडी पुन्हा जोडण्याचे काम सुरू केल्याचे सांगितले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेसच्या वाटाघाटी सुरू असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर गेल्या नाही. आमची त्यांच्यासोबत सीट शेअरींगची चर्चा सुरू असल्याचे राहुल गांधींनी सांगून इंडिया आघाडी पुन्हा एकसंघ करण्याची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेच्या विरोध बंगाली माणसाचा डीएनए असल्याचे गांधींनी सांगितले.

Rahul Gandhi and Nitish Kumar
Rahul Gandhi : आधी दोस्ती, नंतर दुश्मनी; राहुल गांधींचं 'या' बड्या नेत्याबरोबर नेमकं कुठं बिनसलं ?

वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या तुलनेत राहुल गांधी इंडिया आघाडीबाबत अधिक सकारात्मक आणि आशावादी असल्याचे चित्र दिसून आले आहे. राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन आणि स्वतःच्या इंट्रोगेशनची माहिती देत अरविंद केजरीवाल यांना वारंवार ईडीची नोटीस येत असल्याचा दाखला दिला. नितीश कुमार का पळून गेले, याची माहितीच राहुल गांधी यांनी बहरामपूर मध्ये दिली. नितीश कुमार केंद्र सरकारच्या इंट्रोगेशनच्या भीतीने इंडिया आघाडीतून पळून गेल्याचे गांधी म्हणाले.

मुंबईत बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीची इंडिया होऊ नये, याची आम्ही दक्षता घेत आहोत. ‘ताक जरी असले तरी फुंकून पीत आहोत.’ जागावाटपाचा मुद्दा पुढच्या बैठकीत असेल. आजच्या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्रमाबद्दल चर्चा झाली आहे. इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस हे लास्ट पार्टनर राहिले होते. माझ्या माहितीप्रमाणे ते दोघेही वेगळे झालेले आहेत.

काँग्रेस वेगळी जात आहे. शरद पवार गटसुद्धा वेगळा जात आहे. त्यामुळे राज्यात अशी परिस्थिती घडू नये, यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत, असे आंबेडकर यांनी सांगितले. इंडिया आघाडीतून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, नितीश कुमार, भगवंत मान यांच्या गच्छंतीनंतर सपा नेते अखिलेश यादव यांनी तर थेट संभाव्य उमेदवारांची यादीच जाहीर करत काँग्रेसला उत्तर प्रदेशात जोरदार धक्का दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारत जोडो न्याय यात्रेत पुन्हा सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी ममता यांनी इंडिया आघाडी सोडली नसल्याचे सांगत, त्या इंडिया आघाडीत असल्याचे स्पष्ट केले. इतक्यावर राहुल गांधी थांबले नाही तर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत सीट शेअरींगवर निगोसिएशन सुरू असल्याचे सांगितले. देशातील जनता महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त असताना काही विरोधातील राजकीय नेते इंट्रोगेशनने सळो की पळो झाले आहेत, असा दावा गांधी यांनी केला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com