Jalna Maratha Andolan : आरक्षण देता आले असते; पण फोडाफोडीतून वेळ मिळेल, तेव्हा ना...

Devendra Fadanvis : मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Jalna Maratha Movement News : जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. (Devendra Fadnavis should resign)

आज (ता. २) नागपुरात (Nagpur) वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकार फोडाफोडी करण्यातच व्यस्त राहिले. फोडाफोडीतून थोडा वेळ काढून मराठा समाजासाठी काम केले असते, तर आरक्षण देणे सहज शक्य होते. मराठा समाजावरील हा हल्ला सरकार पुरस्कृत आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले होते. पण आरक्षण न दिल्याने आता मराठा समाज आक्रमक होत चालला आहे. असे लाठीचार्ज करून सरकार आंदोलन दडपू शकणार नाही. याचा हिशोब सरकारला द्यावा लागेल.

आमची सत्ता आली, तर मराठा समाजाला लगेच आरक्षण देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दगाबाजीने सत्ता तर आणली. पण, आरक्षणाऐवजी लाठ्या-काठ्यांनी मराठ्यांवर हल्ला केला, मराठा समाजाशी फडणवीसांनी दगाबाजी केली आहे आणि याच याच दगाबाजीविरुद्ध मराठा समाज पेटून उठलाय. मराठ्यांचा रोष या सरकारला जड जाणार असल्याचेही वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Vijay Wadettiwar
Jalna Maratha Protest : लाठीचार्ज करणाऱ्या घमेंडिया मस्तवाल सरकारची मस्ती उतरविण्याची आली वेळ,अंतरवली घटनेवर रोहित पवार संतापले

भाजपने मराठा समाजाची दिशाभूल केली. आरक्षण देऊ शकत नसल्याने मराठा आंदोलकांना चिरडले जात आहे. कालच्या लाठीहल्ल्याची चौकशी व्हावी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. राजीनामा केव्हा देणार, हे त्यांनी स्पष्ट करावे. मराठा आरक्षणाची बाजू सरकारने न्यायालयात नीट मांडली नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर दीड वर्ष सरकारने काहीच केले नाही, असेही ते म्हणाले.

सरकारला वरच्या कोर्टात जात आले असते. मात्र सरकार फोडाफोडीमध्ये व्यस्त राहिले. आम्ही राजकारण करत नाही. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू होते. आंदोलन करणे हा जनसामान्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हा सरकारचा अधिकार निश्‍चितच नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com