Nagpur NDCCB Bank : ‘पळणारा नाही, भिडणारा नेता’ म्हणत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

Congress : सुनील केदार यांची जामिनावर सुटका, रॅली काढून फोडले फटाके
Sunil Kedar Bail Rejected
Sunil Kedar Bail RejectedSarkarnama
Published on
Updated on

Sunil Kedar News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील रोखे घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झालेले माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांची उच्च न्यायालयाने आज जामिनावर सुटका केली. यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘पळणारा नाही, भिडणारा आहे आमचा नेता...,’ अशी घोषणाबाजीही केली.

रोखे घोटाळाप्रकरणी सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा झाली होती. नागपूर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली होती, सोबतच दंडही ठोठावला होती. दंडाची रक्कम केदार यांनी आधीच भरली होती. त्यानंतर जामीन आणि शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर सुनील केदार यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

Sunil Kedar Bail Rejected
Sunil Kedar : सुनील केदार यांना मोठा दिलासा! उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ९) केदार यांच्या विनंतीवर निकाल दिला आणि त्यांची विनंती मान्य केली. आजच्या सुनावणीत केदारांना दिलासा मिळाला. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर केदारांना जामीन मंजूर केला. आता केदारांना दर महिन्याच्या एक तारखेला सत्र न्यायालयात हजेरी द्यावी लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशात तसे नमूद आहे.

राज्य सरकारकडून राजा ठाकरे यांनी तर सुनील केदार यांच्यावतीने सुनील मनोहर यांनी युक्तिवाद केला. सुनील केदार आज जामिनावर कारागृहातून बाहेर पडले. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ‘सुनील केदार जिंदाबाद...’ च्या घोषणा देत रॅली काढली आणि जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपनेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या घरासमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. जामिनावर सुटका होण्यापूर्वीच केदारांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर्स आणि बॅनर्स लावले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत २००१-२००२ मध्ये १५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाला होता. काही कंपन्यांनी रोखे खरेदी केले होते. पण संबंधित कंपन्यांनी रोखे परत दिले नाहीत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर २००२ मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून हा खटला सुरू होता. आजच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी राज्य सरकारने चालवली आहे. त्यासाठी सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत हाती येण्याची वाट आहे.

Edited by : Atul Mehere

R...

Sunil Kedar Bail Rejected
MLA Sunil Kedar: मोठी बातमी! काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com