Kalamb APMC Election Results : कळंब बाजार समितीवर पुरके-देशमुखांची एकहाती सत्ता, बोरीत भाजपला सहा जागा !

Pravin Deshmukh : प्रवीण देशमुख यांनी सतत सहाव्यांदा एकतर्फी विजयी मिळवला आहे.
Bori Arab APMC
Bori Arab APMCSarkarnama

Yavatmal District's Kalamb APMC Election Results News : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब बाजार समितीवर माजी मंत्री वसंतराव पुरके आणि मुंबई बाजार समितीचे माजी संचालक आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख समर्थीत आघाडीने झेंडा फडकावला आहे. येथे संपूर्ण १८ जागांवर त्यांनी विजय मिळवला. (Praveen Deshmukh has scored a one-sided victory for the sixth time in a row)

या बाजार समितीमध्ये प्रवीण देशमुख यांनी सतत सहाव्यांदा एकतर्फी विजयी मिळवला आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये प्रवीण देशमुख व वसंतराव पुरके यांचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. प्रवीण देशमुख यांनी सातत्याने सहाव्यांदा या बाजार समितीचे संचालक म्हणून मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला.

या निवडणुकीत यापूर्वीच विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून सुदाम पवार हे अविरोध विजयी झालेले होते. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेचे सर्व गट एकत्रित येऊनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेही यवतमाळ जिल्ह्यात भाजपला दोन-तीन बाजार समित्या सोडल्यास समाधानकारक कामगिरी करता आली नाही.

विजयी उमेदवारांची नावे ः

सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ - प्रवीण देशमुख, दीपक कदम, महादेव काळे, मधुकर चावरे, लीलाधर चावरे, आनंदरावजी जगताप, निश्चल ठाकरे.

सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघ - कल्पना जगताप, उषा बगमारे

सहकारी संस्था इतर मागासवर्ग मतदार संघ - चंद्रशेखर चांदोरे

सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ - सुदाम पवार अविरोध विजयी

ग्रामपंचायत मतदार संघ सर्व साधारण- प्रदीप झोटिंग, सचिन दरणे

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ - नारायण पिसे

ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल मतदारसंघ - हरिभाऊ कराळे

व्यापारी अडते मतदार संघ - महेंद्र रूहटीया, किशोर भोयर

हमाल मापारी तोलारी मतदारसंघ- राजेंद्र भोयर

Bori Arab APMC
Amravati APMC Election News : राणांना नाही जमली सहकाराची गोळाबेरीज, यशोमतींनी उडवला धुव्वा !

यवतमाळ-बोरीत भाजप मागे..

यवतमाळ बाजार समितीमध्ये कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने मोठा विजय मिळवला. येथे भाजपला केवळ चारच जागा निवडून आणता आल्या. येथे आमदार भाजपचे मदन येरावार आहेत. या निकालाने त्यांच्यावरच प्रश्‍नचिन्ह उभे केले जात आहे. यवतमाळ लगतच्या बोरी अरब बाजार समितीमध्येही भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही.

बोरी अरब मध्ये (Guardian Minister) पालकमंत्री संजय राठोड, (Sanjay Rathod) शिंदे गट आणि राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसने मिळून १२ जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाकडून (Eknath Shinde) स्वतः संजय राठोड तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाना राऊत आणि वसंत घुईखेडकर यांनी किल्ला लढवला. भाजपने यवतमाळात चार तर बोरी अरबमध्ये सहा जागांवर विजय मिळवला. भविष्यात भाजपला जास्त मेहनत घ्यावी लागणार, हे या निकालाने सुचीत केले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com