KCR Nagpur News : जर लोकांना शंका असेल नकोच ती ईव्हीएम !

K Chandrashekhar Rao : देशात परिवर्तन व धोरणात्मक बदल कोणत्याच राजकीय पक्षाला नको आहे.
K Chandrashekhar Rao at Nagpur
K Chandrashekhar Rao at NagpurSarkarnama
Published on
Updated on

No political party wants transformation and policy change : देशात फक्त ब्लेम गेमचे राजकारण सुरू आहे. एकमेकांवर आरोप करून आपली राजकीय पोळी शेकून घेतली जात आहे. देशात परिवर्तन व धोरणात्मक बदल कोणत्याच राजकीय पक्षाला नको आहे, असा घणाघाती आरोप भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केला. (The allegation was made by Bharat Rashtra Samiti leader and Telangana Chief Minister Chandrasekhar Rao)

आज (ता. १५) नागपुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना सर्वप्रथम जीएसटी कर प्रणाली प्रस्ताव आणला होता. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. ते पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जीएसटी कर प्रणाली कायम ठेवली. त्याला आता काँग्रेचे नेते विरोध करीत आहेत.

देशातील धोरणे कालबाह्य झाली आहेत. त्यात सुधारणाच केली जात नाही. कालांतराने बदलही केला जात नाही. त्यामुळे इतर छोट्या मोठ्या देशांच्या तुलनेत आपण विकासात प्रचंड मागे पडलो आहोत. सर्वाधिक नद्या भारतात आहे. त्यातील ५० टक्के पाणी समुद्रात वाहून जाते. इकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी मिळत नाही. असे जल धोरण काय कामाचे? ते सुद्रात बुडवून टाकायला पाहिजे.

जगात सर्वाधिक कृषी जमिन भारतात आहे. मात्र आपण धान्य विदोशातून आयात करतो. असे धोरण काय कामाचे? ते बदलल्या का जात नाही? ७५ वर्षांत भारतातील एकही महत्त्वाचा प्रश्न कायमचा आपल्याला सोडवता आला नसल्याची खंत के चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केली.

K Chandrashekhar Rao at Nagpur
BRS मध्ये जाणार नगरचा हा बडा नेता? | NCP | KCR | Mahrashtra Elections | Sarkarnama Video

अनेक विकसित देशांची आधी ईव्हीएमच वापर केला. त्यावर लोकांचा रोष असल्याने ईव्हीएमचा वापर बंद करण्यात आला. भारतातील नागरिकांना ईव्हीएमवर शंका असेल तर मतपत्रिकेनुसार निवडणूक घ्यावी, असे राव म्हणाले.

तर विदर्भही स्वतंत्र राज्य होईल..

विदर्भच (Vidarbha) नव्हे तर सुमारे डझनभर राज्य स्वतंत्र राज्यांची मागणी करीत आहे. तेंगलणच्या मागणीपूर्वीपासून दिल्लीत (Delhi) अनेकांची आंदोलने सुरू होती. आम्ही अठरा वर्षे संघर्ष केला. केंद्र सरकार (Central Government) व कायद्याने हा प्रश्न प्रचंड जटील करून ठेवला आहे. छोट्या राज्यांचा विकास होतो, हे तेलंगणाने दाखवून दिले आहे. बीआरएसचा जोर धोरण बदलावरच आहे. ते बदलल्यास विदर्भसुद्धा स्वतंत्र राज्य होऊ शकते, असे चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com