Labor Minister : अनिल परब आक्रमक झाल्यावर कामगार मंत्र्यांनी दिले ‘त्यांच्या’ अटकेचे आदेश !

Jindal : जिंदाल कंपनीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे कामगारांचा जीव गेला आहे.
Anil Parab and Suresh Khade
Anil Parab and Suresh KhadeSarkarnama

Anil Parab became aggressive in the hall : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल कंपनीमध्ये झालेल्या दुर्घटनेत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला होता, तर काही कामगार जखमी झाले होते. आजही मृत आणि जखमी कामगारांना न्याय मिळालेला नाही. आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी हा मुद्दा उचलून धरला.

नाशिक जिल्ह्यातील जिंदाल कंपनीच्या मालकावर कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पण अटक अद्याप झालेली नाही. यावरून परब सभागृहात आक्रमक झाले. त्यांना इतर सदस्यांनीही साथ दिली. जिंदाल कंपनीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे कामगारांचा जीव गेला आहे. त्यामुळे मालकाने २५ लाख रुपये मृतांच्या कुटुंबीयांना दिले पाहिजे, असे परब म्हणाले. याशिवाय अटकही केली पाहिजे, असे ते म्हणाले.

अनिल परब (Anil Parab) आक्रमक झाल्यानंतर कामगार मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी सांगितले की अद्याप त्या प्रकरणाचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे दोषींना अटक झाली नाही. पण सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता अटक करण्याचे आदेश देऊ, असे आश्‍वासन सभागृहाला दिले. कंपनीच्या मालकावर कारवाई होईल, पण अपघाताला जबाबदार असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? ते फक्त नोटीस देण्यापुरतेच आहेत का, असा सवाल अनिकेत तटकरे यांनी केला.

कारखानदारांवर कारवाई तर केलीच पाहिजे. पण शासकीय अधिकाऱ्यांनादेखील यासाठी दोषी धरले पाहिजे, असे ते म्हणाले. कारखाना अति धोकादायक स्थितीत आहे, अनेक त्रुटी होत्या, हे एक वर्षापूर्वी सांगितले गेले होते. मग संबंधित अधिकाऱ्याने काय केले, असा प्रश्‍न विचारत मृतांच्या कुटुंबीयांना नोकरी दिली का, कारखाना त्यांना काय देणार, याचे ठोस उत्तर दिलेले नाही. अधिवेशनापूर्वी नुकसान भरपाईची रक्कम आणि मृतांच्या कुटुंबीयांना नोकरी मिळाली पाहिजे, असेही तटकरे म्हणाले.

Anil Parab and Suresh Khade
Anil Parab News : सोमय्यांनी इथे यावचं, शिवसैनिक स्वागतासाठी तयार आहेत; परबांचं सोमय्यांना खुलं आव्हान

त्या कामगारांना पेन्शन लागू झाली, नोकरी देताना वारस नोंद हा महत्वाचा विषय आहे. न्यायालयातून (Court) हा विषय मार्गी लागला की लगेच नोकरीचा विषय मार्गी लावणार. दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्‍वासन सुरेश खाडे यांनी सभागृहाला दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com