Ajit Pawar NCP Office: राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा !

NCP Nagpur : कार्यकर्त्यांसमोर ‘दादा’ की ‘साहेब’, असा पेच निर्माण झाला.
Ishwar Balbudhe
Ishwar BalbudheSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News in Marathi : अजित पवारांनी सत्तेमध्ये सहभागी होऊन राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांसमोर ‘दादा’ की ‘साहेब’, असा पेच निर्माण झाला. त्यातच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नागपुरातील समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दावा ठोकला आहे. (Supporters have sued the office of NCP)

काल (ता. २) राजकीय भूकंपानंतर नागपुरातील बहुतांश कार्यकर्ते, नेते अजित पवार यांच्या सोबत असल्याचे चित्र दिसत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गट शरद पवार यांच्यासोबत गेला आहे. अनिल देशमुख आज कराड येथे शरद पवारांसोबत पोहोचले आहेत. त्यामुळे विदर्भातील त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायचा तो संदेश पोहोचला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीनंतर राज्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करू, असे अनिल देशमुखांनी कराड येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले आहे. दरम्यान आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि नागपुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आमचाच हक्क असल्याचे बाळबुधे यांनी आज सकाळी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते अजित दादांसोबत आहोत आणि हे कार्यालय आम्हा कार्यकर्त्यांचं आहे, असे बाळबुधे म्हणाले. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे राज्यभरातील कार्यकर्ते अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावाही बाळबुधे यांनी केला आहे.

Ishwar Balbudhe
Sharad Pawar ; भर पावसात थांबले कार्यकर्ते | Ajit Pawar oth| NCP splits | Sarkarnama video

महाराष्ट्राच्या राजकारणात काल रविवारी (२ जुलै) मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह मोठा गट त्यांच्यासोबत आहे.

ज्यांना राष्ट्रवादीचे निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते असं म्हटलं जायचं त्यांनीही पक्षाची साथ सोडली. हा शरद पवारांसाठी मोठा धक्का आहे. असाच प्रकार २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडला होता.

Ishwar Balbudhe
Supriya Sule जेव्हा Ajit Pawar यांच्यावर थेट बोलतात | NCP splits| Sarkarnama video

शरद पवारांनी (Sharad Pawar) एक हाती किल्ला लढवत तब्बल ५४ आमदार निवडून आणले होते आणि महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग करून सत्ताही हस्तगत केली होती. आता पवार पुन्हा ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यामुळे ते यावेळी पुन्हा राष्ट्रवादीला (NCP) उभारी देतील आणि गद्दारांना धडा शिकवतील, असा विश्‍वास कार्यकर्त्यांना आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com