Amravati Tension : कमानीच्या वादावरून अमरावतीत तणाव; पोलिसांचा लाठीमार

Pandhari Khanapur : अमरावती विभागीय आयुक्तालयापुढे पाच दिवसांपासून सुरू होते आंदोलन. दगडफेकीनंतर वातावरण चिघळले.
Tension in Amravati
Tension in AmravatiSarkarnama

Amravati Tension : अमरावती जिल्ह्यात कमान उभारण्याच्या कारणावरून निर्माण झालेला वाद चिघळल्यानंतर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानापूर गावात कमान उभारण्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अशात सोमवारी (ता. 11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत काही पोलिस जखमी झालेत.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबावरून दगडफेक करणाऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. पांढरी खानापूर गावात गेल्या काही दिवसांपासून कमान उभारण्यावरून वाद सुरू आहे. कमान उभारण्यावरून गावात दोन गट पडले आहेत. एका गटाला कोणत्याही परिस्थितीत कमान उभारायची आहे, तर दुसरा गट याला कडाडून विरोध करीत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Tension in Amravati
Navneet Rana : नवनीत राणांचे सूचक विधान, मोदी - फडणवीस काय निर्णय घेणार ? | Amravati |

अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कमानीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या नागरिकांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी लेखी स्वरूपात परवानगी देण्याची मागणी केली होती. परवानगी देण्यासाठी व हा वाद सोडविण्यासाठी प्रशासनाने वेळ मागून घेतली होती. अशात ठिय्या आंदोलन सुरूच होते. सोमवारी कमानीच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा प्रशासकीय कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर अचानक दगडफेकीला सुरुवात झाली. जमावाने महसूल विभागाच्या कार्यालयाचे फाटक तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविल्याने तुफान दगडफेक करण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लाठीहल्ल्याचा आदेश दिला. लाठीहल्ल्यानंतर जमाव पांगल्याने त्यांनी सापडेल त्या दिशेने दगडफेक केली. अशात पाण्याचा मारा करून जमावावर नियंत्रण मिळवावे लागले.

दगडफेकीच्या या घटनेनंतर मोठा पोलिस ताफा शहरात तैनात करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. दगडफेकीत सुरुवातीला एक पोलिस जखमी झाल्याची माहिती पुढे आली. मात्र, दगडफेकीची तीव्रता पाहता जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमरावती शहरात घडलेल्या या प्रकारानंतर राजकीय क्षेत्रातील मंडळींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी हा प्रकार जातीय तेढ निर्माण करणारा असल्याचे सांगितले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने-सामने आले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून खानापूर गावच्या प्रवेशद्वाराचा वाद सुरू आहे. यावरून स्थानिकांनी आंदोलनही केले होते. यानंतर पोलिसांनी संचारबंदी लागू केली होती. मात्र, संचारबंदी झुगारून मोठ्या संख्येने आंदोलक अमरावतीत पोहोचले.

Edited By : Prasannaa Jakate

R

Tension in Amravati
‘भाजपचा छोटे पक्ष संपवण्याचा...’, बच्चू कडू कडाडले | Bacchu Kadu | BJP | Amravati |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com