विधान परिषद निवडणूक : या मतदारांनो परत फिरा रे…

काँग्रेसचे (Congress) मतदारसुद्धा आपण उमेदवाराला अद्याप बघितले नसल्याचे खासगीत सांगत होते. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक (Election) सोडल्याचे चित्र दिसत होते.
Assembly
AssemblySarkarnama

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकी घोषित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (BJP) ३३४ मतदार सदस्य सहलीला गेले होते. विविध राज्यांत सहलीला गेलेले हे सदस्य आता नागपुरात (Nagpur) परतू लागले आहे. पक्षाने ‘या मतदारांनो परत फिरा रे...’, असा संदेश दिल्यानंतर देशाच्या विविध राज्यांतून त्यांनी नागपूरकडे कूच केल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूर महानगरपालिकेतील १०५ नगरसेवकांपैकी १०२ नगरसेवक सहलीला गेले होते, ते आज गोवा आणि जम्मू काश्‍मीर येथून परतले आहेत. नागपूर ग्रामीणमधील बव्हंशी मतदार सदस्य बसेसनी देशाच्या काही राज्यांमध्ये गेले होते. त्यांनादेखील ‘परत फिरा रे....’चे आदेश काल मिळाले. त्यानुसार ते सर्व जण नागपूरकडे निघाले आहेत. बहुतेक बसेस आज सायंकाळी नागपुरात (महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर) दाखल होतील. आज आणि उद्या तेथेच मुक्काम करून शुक्रवारी १० डिसेंबर रोजी सर्व मतदार मतदार केंद्रांवर पोहोचणार आहेत.

शुक्रवारी मतदान केल्यानंतरच मतदारांना आपल्या घरी जाता येणार आहे. भाजपच्या नेत्यांनी विजयी होण्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे. काल सायंकाळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी चंद्रशेखर बावनकुळे ४०० मते घेऊन विजयी होतील, असे सांगितले आहे. भाजपचे सर्व सदस्य मतदार सहलीला गेल्यानंतर ते निश्चिन्त आहेत. याशिवाय महाविकास आघाडीतील पक्षांचे सदस्यसुद्धा संपर्कात असल्यामुळे ४०० मतांचा आकडा निश्‍चितपणे गाठू, असा विश्‍वास भाजप नेते व्यक्त करीत आहेत.

Assembly
बावनकुळे म्हणाले, या सरकारला ओबीसींच्या जागांवर पैसेवाले, सुभेदार आणायचे आहे...

शिवसेनेकडे २७ तर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे २४ मतदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतर्फे अद्याप कुठल्याही काँग्रेस नेत्याने तसेच उमेदवाराने संपर्क साधला नसल्याचे सांगण्यात येत होते. कालपर्यंत हीच स्थिती कायम होती. त्यामुळे काँग्रेसला आमच्या मतांची गरज नसावी असे सेना व राष्ट्रवादीचे मतदार बोलत होते. काँग्रेसचे मतदारसुद्धा आपण उमेदवाराला अद्याप बघितले नसल्याचे खासगीत सांगत होते. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक सोडल्याचे चित्र दिसत होते. याचा फायदा घेत भाजपने अपप्रचार सुरू केला होता. काँग्रेस उमेदवार बदलणार असल्याच्याही अफवा पसरविल्या होत्या. नाचक्की होऊ नये म्हणून काँग्रेस नेत्यांनी आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत संपर्क साधला असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com