Deepak Kesarkar: शाळेची घंटा नऊ नंतरच वाजणार...

Maharashtra Assembly session 2023: राज्यपालांच्या सूचनेची दीपक केसरकर यांनी घेतली दखल
Deepak Kesarkar On Teachers Recruitment :
Deepak Kesarkar On Teachers Recruitment :Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: बदलती जीवनशैलीमुळे लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे लहानमुलांसह त्यांच्या पालकांना त्रास सहन करावा लागतो. शाळेत जाताना लहान मुलांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल बैस यांनी केली होती. राज्यपालांनी केलेल्या सूचनेची दखल घेत लहान मुलांची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतरच सुरू केल्या जातील, अशी घोषणा राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशात लहान मुलांच्या शाळेंच्या वेळेबाबत चर्चा सुरू होती. त्यानुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षापासून माध्यमिक सत्रातील शाळा दुपारच्या वेळेत तर नर्सरी ते पाचवी पर्यंतचे वर्ग सकाळच्या सत्रात भरविले जात आहेत. लहान मुलांच्या शाळा सकाळी असल्याने लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. परिणामी शाळांमध्ये आल्यानंतर देखील लहान मुले डुलक्या काढत असल्याचे चित्र अनेक शाळांमध्ये पहायला मिळत आहे. इच्छा नसतानाही मुलांना सकाळी उठवून शाळेत पाठविताना पालकांची तारांबळ उडते. यामधून पालकांसह लहान मुलांमध्ये चिडचिडीचे प्रमाण वाढले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Deepak Kesarkar On Teachers Recruitment :
Tuljabhavani Temple Fraud: तुळजाभवानी देवीच्या दागिने भेसळीचा तपास करणार; फडणवीसांची ग्वाही

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. याची दखल घेत शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची घोषणा अधिवेशनात केली. इयत्ता दुसरीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरविण्यात येणार असून दुसरीनंतरचे वर्ग कधी भरवायचे याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार असून या समितीच्या अहवालानंतर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षापासून बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कुटूंबातील आई-वडील दोघे नोकरी करतात. मोबाईल, टी.व्ही.चा वाढता वापर यामुळे लहान मुले बहुतांश वेळेला यामध्ये मग्न असतात. शहर आणि ग्रामीण भाग हा जवळपास एकच झाला असल्याने रात्री झोपायला पालकांसह मुलांना उशीर होतो. त्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही. कमी झोप झाल्याने मुलांसह त्यांच्या पालकांच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.

Edited By - Chaitanya Machale

Deepak Kesarkar On Teachers Recruitment :
Uddhav Thackeray : " मध्य प्रदेशात शिवराज सिंहाना बदललं तसं मोदींनाही..."; उद्धव ठाकरेंचं दिल्लीतून सूचक विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com