Nagpur Winter Session : सत्ताधाऱ्यांची आजपासून अग्निपरीक्षा; विरोधकांबरोबर 50 मोर्चांना थोपविण्याचे आव्हान

Maharashtra Assembly Winter Session 2023 : 70 हून अधिक मोर्चे परवानगीच्या प्रतीक्षेत
Nagpur Winter Session
Nagpur Winter SessionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Winter Session 2023 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून, सभागृहात विरोधकांना उत्तर देण्याची तर सभागृहाबाहेर धडकणाऱ्या मोर्चांना थोपविण्याची अग्निपरीक्षा सरकारला द्यावी लागणार आहे. तब्बल 50 हून अधिक मोर्चे धडकणार आहेत, तर 70 हुन अधिक मोर्चे परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला विविध प्रश्नांवरून अडवून त्यांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे विविध मागण्या, प्रलंबित प्रश्न यावर सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चे निघणार आहेत. या वेळेला तब्बल 50 मोर्चांना प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच विधान भवनाच्या दारात आंदोलने पाहायला मिळणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagpur Winter Session
Uddhav Thackeray On Maharashtra Politics: ठाकरेंचा CM Eknath Shinde यांना टोला | Shivsena Podcast |

70 मोर्चांना परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या मोर्चांमध्ये संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे विषय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय विषय या मोर्चांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडले जातात. काही विषय निकाली निघतात, तर काही प्रतीक्षेत राहतात. मात्र, नागपूरच्या विधिमंडळावर निघणारे मोर्चे नेहमी चर्चेचा विषय राहतात. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com