लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस ठरला. त्यामुळे काँग्रेस पक्षाची महत्त्वकांक्षा बळावली आहे. काँग्रेसने 13 जागा मिळवल्यानंतर राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांचे 'भावी मुख्यमंत्री'म्हणून बॅनर झळकले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांचा 'भावी मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख करण्यात आला. आपल्या भाषणातून वडेट्टीवार यांनी राज्यात महाविकास आघाडी व काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचे सांगितले. पण 'मुख्यमंत्री..,मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील 30 जणांना जनतेने खासदार केले, आता विधानसभेत (Maharashtra Vidhansabha Election)आमदार निवडून आणू, असा निर्धार वडेट्टीवार यांनी केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर व्याहाड-खुर्द या गावी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांचा सत्कार सोहळा विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारला. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्या. धानोरकरांनी या कार्यक्रमाला दांडी का मारली, असा प्रश्न विचारला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.