Mahavikas Aghadi's Meeting in Nagpur : महाविकास आघाडीची नागपुरात होणारी वज्रमूठ सभा होण्यापूर्वीच चर्चेत आली आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे या सभेला दर्शन कॉलनीतील मैदान देण्यासाठी प्रचंड विरोध करीत आहेत. तर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा सभेला विरोध नसल्याचे म्हटले आहे. (Bawankule has said that BJP is not opposed to the assembly)
दरम्यान स्थानिक नागरिकांनी वज्रमूठ सभेसाठी मैदान देऊ नये, यासाठी स्थानिक नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली. या प्रकरणात थोड्याच वेळापूर्वी उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे.
याचिककर्त्यातर्फे उच्च न्यायालयात सभेविरोधात वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या स्थानिक रहिवाशांच्या प्रतिक्रिया सादर करण्यात आल्या. दर्शन कॉलनीतील रहिवासी धीरज शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे.
सभेला परवानगी दिल्याची माहिती महापालिकेतर्फे न्यायालयाला देण्यात आली आहे. कॉंग्रेसचे नेते व माजी नगरसेवक तानाजी वनवे यांना प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिस आणि प्रशासनाने घालून दिलेल्या अटींवर वज्रमूठ सभेला परवानगी देण्यात आली आहे.
नासुप्र, महानगरपालिका आणि पोलिसांनी यापूर्वीच सभेला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे सभा होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. २४ तारखेला सर्व प्रतिवाद्यांना सभेच्या आयोजनाबाबत उत्तर दाखल करायचे आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील यशस्वी सभेनंतर महाविकास आघाडीच्या नागपूर (Nagpur) येथील सभेला परवानगी मिळण्याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. सभेला अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना पोलिसांची परवानगी न मिळाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सभेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, अखेर पोलिसांनी (Police) देखील या सभेला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी सभेसाठी काही अटी आणि शर्ती देखील घालून दिल्या आहेत. आता न्यायालयानेही (Court) सभेला हिरवा झेंडा दाखवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.