Rana Vs Wankhede: अनेक वर्षांनंतर भाजप-काँग्रेस आमने-सामने; नवनीत राणा Vs वानखेडेंत चुरशीची लढत

Amravati Lok Sabha Election 2024: प्रहारचे आमदार राजकुमार पटेल तसेच अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांना उमेदवारी दिल्याने ते मेळघाटात चांगलाच जोर लावतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे नवनीत राणा येथे कोणती युक्ती लढवितात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Rana Vs Wankhede
Rana Vs WankhedeSarkarnama

सुरेंद्र चापोरकर

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जातप्रमाणपत्राचा राखीव निकाल गुरुवारी लागला. राणा यांचा जातीचा दाखला बनावट ठरविण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर राणा यांनी अमरावतीमधून महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) विरुद्ध भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यात सामना होईल, हे आता स्पष्ट झाले आहे.

जागावाटपावरून महायुतीतला बेबनाव, शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत ‘प्रहार’च्या वतीने दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार, रिपाइंने उमेदवारीची केलेली घोषणा, यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.

प्रहारचे आमदार राजकुमार पटेल तसेच अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांना उमेदवारी दिल्याने ते मेळघाटात चांगलाच जोर लावतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे नवनीत राणा येथे कोणती युक्ती लढवितात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी (Amravati Lok Sabha Election)शिवसेनेच्या दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. ही जागा जिंकण्यासाठी दोन्ही गटांनी चांगलीच कंबर कसली आहे. यात महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीत असतानाही माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लढतीचे चित्र बदलेल, अशा राजकीय अमरावतीत दररोज घडणाऱ्या विविध घडामोडींनी अतिशय वेग आला आहे. महायुती आणि आघाडी यांच्यात यंदा चुरशीची टक्कर होणार आहे. महाविकास आघाडी व महायुतीत एकाच वेळी बंड पुकारण्यात आल्याची घटना अमरावतीत घडली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे बंड टिकेल काय, हे अर्ज भरण्याच्या माघारीच्या दिवशीच समजेल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असलेल्या दिनेश बूब यांनी ‘प्रहार’च्या वतीने निवडणूक रिंगणात असल्याने महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी काय राजकीय हालचाली होतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

असा आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ

 • सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी भाजपचा आमदार नाही, तीन मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार आहेत.

 • ठाकरे यांच्या विरोधात राणा दाम्पत्याने मोर्चा उघडल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

 • काँग्रेससुद्धा या मतदारसंघात आपला पंजा प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे.

 • दिनेश बूब यांच्या उमेदवारीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना कुणाच्या बाजूने राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 • २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा या अपक्ष उमेदवार होत्या व त्यांनी ५ लाख १० हजार ९४७ मते मिळवून विजय प्राप्त केला होता.

 • शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ४ लाख ७३ हजार ९९६ मते मिळाली होती.

 • वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांनी ६५ हजार १३५ मते मिळविली होती.

Rana Vs Wankhede
Sujay Vikhe-Patil: सुजय विखेंच्या इंग्रजीवरून बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राची आठवण; मला इंग्रजी ना कळतं ना हिंदीही!

अमरावती लोकसभा एकूण मतदार

 • अमरावती मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १८ लाख २८ हजार ९७० एवढी आहे.

 • अनुसूचित जाती प्रवर्गाची मते सुमारे चार ते पाच लाख आहेत.

 • मेळघाटच्या आदिवासीबहुल भागात सुमारे तीन ते चार लाख मते आहेत.

 • मुस्लिम मतांची संख्या तीन ते चार लाखांच्या घरात आहे, तर ओबीसी प्रवर्गाची मते सहा ते सात लाख आहेत.

 • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com