Manikrao Kokate : शिवसैनिकांनी कोकोटेंचा पुतळा फासावर लटकवला!

Thackeray group protests Manikrao Kokate: शेतकऱ्यांबदल जर कुणी अशोभनीय वक्तव्य करीत असेल, तर त्याला मंत्रिपदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही. कोकाटेंचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी ठाकरे गटाने लावून धरली.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal News: शेतकऱ्यांबाबत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे. आर्णीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

कोकाटेंच्या निषेध करण्यासाठी ठाकरे यांचे शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन छेडलं आहे. त्यांनी कोकाटेंचा पुतळा फासावर लटकावून निषेध नोंदवला. शिवनेरी चौकात कृषी मंत्र्याचा पुतळा फासावर लटकवून जोरदार आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी केली.

Manikrao Kokate
Ajit Pawar: परंपरागत विरोधकाला अजितदादांचा पाठिंबा? छत्रपती कारखान्याच्या जबाबदारी सोपवणार..

मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्याचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी प्रवीण शिंदे यांनी केली. शेतकऱ्यांबदल जर कुणी अशोभनीय वक्तव्य करीत असेल, तर त्याला मंत्रिपदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही. कोकाटेंचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी ठाकरे गटाने लावून धरली.

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख उज्ज्वल मोरे,पंकज शिवरामवार,रमेश ठाकरे,पवन वाघमारे,दिनेश पवार,आनंद शिंदे,गोकुळ शिंगघर, प्रमोद शिंदे, गोविंद बिस्मोरे आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.त्यांच्या विधानावर वाद निर्माण झाल्यानंतर आता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मस्करीमध्ये बोललो. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो, असे सांगत कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.

काकडे यांच्या वक्तव्यावरून विविध शेतकरी संघटना आणि विरोधकांनी महायुती सरकारला घेरले आहे. त्यामुळे महायुती सरकार बॅक फुटवर गेल्याचे चित्र आहे. आज रामनवमीच्या निमित्ताने कोकाटे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी त्यांनी काळारामाला साकडे घातले. बळीराजाच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे

एका शेतकऱ्याने कर्जमाफीबद्दल कोकाटे यांनी विचारले होते. अजितदादा म्हणत आहेत, कर्जमाफी होणार नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्यांची तर कर्जमाफी होईल का? असा प्रश्न या शेतकऱ्याने केला होता. शेतकऱ्याच्या याच प्रश्नाचे उत्तर देताना, कर्ज घ्यायचं आणि पुढचे पाच-दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. जोपर्यंत कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत वाट पाहायची, असं शेतकरी करतात. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीत एका रुपयांचीतरी गुंतवणूक आहे का? असा सवाल कोकाटे यांनी केला होता. शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या याच विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com