नागपूर : जर का दोन-तीन वर्षांपूर्वी तुमची एखादी वस्तू चोरीला गेली. तुम्ही पोलिसांत तक्रार दिली. पण ती मिळालीच नाही, तर.. तर… तुम्ही विसरून जाता आणि रुटीन आयुष्य जगत राहता. पण जर का अशीच चोरीला गेलेली वस्तू तुम्हाला अचानक परत मिळाली, तर तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल. नेमका हाच आनंद मानकापूर पोलिसांनी नागरिकांना दिला.
दिवाळी सणाला प्रत्येकामध्ये एक वेगळाच उत्साह संचारला असतो. सर्वत्र शुभेच्छांची आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण सुरू असते. अशा समयी आपल्याला कधी काळी हरविलेल्या वस्तूची आठवणदेखील येत नाही. पण पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तुम्ही काही दिवसांनी विसरून जाता. पण पोलिस आपले काम करीतच असतात. अशाच एका चोरीच्या प्रकरणाचा तगडा पाठपुरावा मानकापूर पोलिसांनी केला आणि मोबाईल फोन चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून हस्तगत केलेले मोबाईल फोन त्यांच्या मालकांना परत केले आणि त्यांना या दिवाळीची अनोखी भेट दिली.
या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी सर्व तांत्रिक बाजूंचा अभ्यास करून तपास केला. २०१८ मध्ये चोरीला गेले ६ मोबाईल फोन चोरट्यांकडून हस्तगत केले. यामध्ये पोलिसांचाही कस लागला. पण त्या ६ नागरिकांच्या चेहऱ्यांवर जो आनंद होता, तो देव भेटल्यासारखा होता. या लोकांनी पोलिसांचे आभार मानले अन् त्यांच्या कामगिरीचे कौतुक करायलाही ते विसरले नाही. काहीही झाले की पोलिसांना दोष देण्याची एक सवयच लोकांना जडली आहे. पण पोलिस आपले काम करीत असतात, कुठे यश येते, तर कुठे अपयशाचाही सामना करावा लागतो. पण अपयश हीच यशाची पहिली पायरी समजून पोलिस यंत्रणा आपले काम अव्याहतपणे करीत असते, हेच या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.
आयएमईआय नंबरवरून आणि सीडीआरवरून हरविलेल्या मोबाईल फोनचा तपास आम्ही केला. मागील काळात असेच आम्ही ६ मोबाईल शोधून लोकांना परत केले. आतासुद्धा ७० हजार रुपये किंमत असलेले ६ मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत केले. या प्रकरणातील गुन्हेगार एका ठिकाणी चोरी केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी चोरी करताना शर्ट बदलत होता. ही बाब आम्हाला तपासात लक्षात आली.
- वैजनता मांडवधारे, पीआय, मानकापूर पोलिस ठाणे, नागपूर.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.