Akola Maratha Reservation : दीडशे एकर जागेवर होणार जरांगे पाटलांची सभा

Preparation On : अकोल्यातील चरणगावात तयारी जोरात, पाच जिल्ह्यांसाठी ‘हायटेक वॉररूम’
Preparation in Akola for Manoj Jarange Patil Public Meeting.
Preparation in Akola for Manoj Jarange Patil Public Meeting.Sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण मिळावं, यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला दिवाळीनंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. सभेच्या निमित्तानं जरांगे पाटील अकोला जिल्ह्यात येणार आहेत. त्यातून ते मराठा बांधवांची मोट बांधणार आहेत.

राज्यात विविध ठिकाणी सभा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची विदर्भातील पहिली सभा जिल्ह्यातील चरणगाव येथे होणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही सभा होणार आहे. त्यासाठी सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. अशात मराठा आरक्षणासाठी चरणगावात गेल्या २५ दिवसांपासून साखळी उपोषण सुरूच आहे. (Manoj Jarange Patil's Public Meeting For Maratha Reservation To Be Held On 150 Acer Land In Charangaon Of Akola District)

Preparation in Akola for Manoj Jarange Patil Public Meeting.
Akola Vanchit Aaghadi : जोरदार मोर्चेबांधणी करीत ‘वंचित’नं तयार केला रोडमॅप

मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे दोन वेळा अन्नत्याग आंदोलन केलं. त्यामुळं सरकारला मोठी कसरत करावी लागली .सरकारला अल्टिमेटम देऊन दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दिवाळीनंतर त्यांनी सभा घेण्यास सुरुवात केलीय. ठिकठिकाणी ते मराठा आरक्षणाची मागणी लावून धरीत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाला एकत्र करीत आहेत.

अकोला जिल्ह्यातही त्यांची सभा होणार आहे. यासाठी चरणगावातील दीडशे एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली. पातूर तालुक्यातील चरणगाव येथील सकल मराठा समाजाने यासाठी पुढाकार घेतलाय. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतून मराठा या सभेला येणार आहेत. अकोला मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सभेचे नियोजन करण्यात आलं. सभास्थळाला मराठा क्रांती मैदान असं नाव देण्यात आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विदर्भात सर्वप्रथम पातूर तालुक्यातील चरणगाव येथे जरांगे पाटलांच्या समर्थनात २९ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरू झाले. आंदोलनाला आता २५ दिवस झाले आहेत. चरणगाव येथे सातत्यानं आंदोलन सुरू असल्यानं या आंदोलनाची दखल घेत मनोज जरांगे पाटील यांनी चरणगाव येथे सभा घेण्याचं निमंत्रण ग्रामस्थांकडून स्वीकारलं होतं. या सभेसाठी भव्य ‘वॉररूम’ तयार करण्यात आली आहे. येथे मराठा समाजातील संगणक, आयटी तज्ज्ञ, अभियंता, निवृत्त पोलिस अधिकारी, सीए, विधिज्ञ, यू-ट्यूबर, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञाची यादी तयार करण्यात येत आहे. पाचही जिल्ह्यांतील प्रत्येक गावामध्ये मराठा नेते व कार्यकर्त्यांना सभेसाठी फोन, एसएमएस व व्हॉट्सअॅप संदेश जात आहेत. मराठा समाजातील स्वयंसेवक यासाठी स्वयंस्फूर्तीनं सरसावले आहेत. सभेत पाच जिल्ह्यांतून किमान १० लाख मराठा उपस्थित राहतील, अशा पद्धतीनं नियोजन करण्यात येत आहे.

‘सरकारनामा’ने दिलं होतं वृत्त

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची सभा अकोल्या जिल्ह्यातील चरणगाव येथे होणार असल्याचं वृत्त केवळ ‘सरकारनामा’नं प्रकाशित केलं होतं. गावातील मराठा बांधवांनी जालना येथे जात जरांगे पाटलांना निमंत्रण दिल्याचं वृत्तही प्रकाशित करण्यात आलं होतं.

Edited by : Prasannaa Jakate

Preparation in Akola for Manoj Jarange Patil Public Meeting.
Maratha Protest in Akola : जरांगेंनंतर गजानन यांनीही घेतलं उपोषण मागं, गावागावांत जाऊन आता मराठ्यांना करणार जागं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com