Ajit Pawar: हल्ली अनेक राज्यपाल वादात सापडतात; कौतुक राष्ट्रपतींचे, टोला कोश्‍यारींना...

सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्‍ट्रपतींचे अभिनंदन केले.
Ajit pawar on Bhagatsingh Koshyari
Ajit pawar on Bhagatsingh KoshyariSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : पावसाळी अधिवेशनाला आज सुरूवात झाली. सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रपती (President) द्रौपदी मुर्मू यांचे तोंडभरून कौतुक केले. पण राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना टोला लगावला.

राष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावर सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलले. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्‍ट्रपतींचे अभिनंदन केले. यावेळी पवार म्हणाले, द्रौपदी मुर्मू या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांच्याबद्दलची बरीचशी माहिती आपल्या सर्वांना नव्हती. कौटुंबिक जीवनात अनेक धक्के त्यांनी सहन केले. तरीही सामाजिक काम सुरूच ठेवले. निःस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख झाली. ओरिसा मयुरगंज मधील आदिवासी पाड्यावर त्यांचा जन्म झाला. एक शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. यापूर्वी सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षकी पेशातील व्यक्ती राष्ट्रपती झाले होते आणि त्यांच्यानंतर आता द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झालेल्या आहेत.

Ajit pawar on Bhagatsingh Koshyari
Ajit pawar Video : सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?; अजित पवार कडाडले!

राजकीय आलेख उंचावताना कौटुंबिक संकटांना त्या सामोरे गेल्या. पती, दोन मुलं, आई, भाऊ त्यांनी गमावले. हे दुःख पचवणे कठीण होते. २००९ मध्ये एका मुलाचं मग तीन वर्षांनी दुसऱ्या मुलाचं निधन त्यापूर्वी पतीचे निधन झाले होते. आता मुलगी बॅंकेत काम करते. या दुःखाची जाणीव राजकीय सामाजिक कामावर त्यांनी होऊ दिली नाही. १८ मे २०१५ रोजी झारखंडच्या पहिल्या महिला आदिवासी राज्यपाल होत्या. त्यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही त्यांना हटवण्यात आले नव्हते. लोकप्रिय राज्यपाल म्हणून त्यांची ओळख होती. सत्ताधारी आणि विरोधकांच्या कौतुकास त्या पात्र ठरल्या. नाहीतर हल्ली अनेक राज्यपाल पक्षपात करतात अन् वादात सापडतात, पण त्यांच्याबद्दल असे काहीही झाले नाही, असे म्हणत अजित दादांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsingh Koshyari) यांना टोला लगावला.

राजकीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या सांभाळताना देशाच्या सर्वोच्च पदावर त्या पोहोचल्या, हा स्त्री शक्तीचा गौरव आहे. अमृत महोत्सवी वर्षात महिला राष्ट्रपतिपदी विराजमान होते, ही अभिमानाची बाब आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच पुढे राहिला आहे. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा मुलींसाठी सुरू केली. मुर्मूंची निवड स्त्री शिक्षणाच्या लढ्याला अधिक बळ देणारी आहे. नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री, झारखंडच्या राज्यपाल आणि आता राष्ट्रपती असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. मागच्या वर्षी २०२१ मध्ये त्यांचा राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतरही त्या पदावर का करण्याची संधी त्यांना मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com