Nagpur Protest : ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे विदर्भात अफवाच अफवा...

MSRTC : एसटी महामंडळाच्या काही फेऱ्या रद्द; काही ठिकाणी जाळले टायर
MSRTC Buses in Bhandara.
MSRTC Buses in Bhandara.Sarkarnama
Published on
Updated on

Hit And Run Case : राज्यभरात ट्रकचालकांचे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळालादेखील बसला असल्याचे सांगण्यात येत आहे. भंडारा जिल्हा प्रशासनात त्यावेळी खळबळ उडाली, ज्यावेळी तब्बल 250 बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती प्रसारित झाली आणि ट्रकचालकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. प्रशासनाने या दोन्ही बाबींचे खंडन केले आहे. ट्रकचालकांनी काही ठिकाणी उग्र आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोख पोलिस बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. केंद्र सरकारने नवीन कायदा अस्तित्वात आणला आहे. त्यानुसार चालकाच्या हातून अपघात झाल्यास व तो पळून गेल्यास 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. ‘हिट अँड रन’च्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने हा कायदा करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. नवीन कायद्याच्याविरोधात ट्रकचालकांनी नागपूर-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यात बंद पुकारला. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ट्रकचालकांनी पुकारलेल्या बंदचा फटका भंडारा आगारातून सुटणाऱ्या एसटी बोवर पडल्याचा दावा करण्यात येत होता आहे, मात्र तो चुकीचा असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

MSRTC Buses in Bhandara.
Nagpur : सरकारने नियुक्त्या करताना विचार करावा... असं का म्हणाले वडेट्टीवार?

खबरदारीचा उपाय म्हणून एसटी प्रशासनाने अगदी मोजक्याच गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे काही प्रवाशांची गैरसोय झाली, मात्र मोठ्या प्रमाणावर बसफेऱ्या विदर्भात कुठेही रद्द करण्यात आल्या नाहीत, असे एसटीच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अशातच पोलिसांवर हल्ल्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला. हा व्हिडीओ देखील भंडारा जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ भंडारा जिल्ह्यातील नाही, असे स्पष्ट केले.

राज्यभरात ठिकठिकाणी ट्रकचालककांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आंदोलनामुळे विदर्भात अनेक महामार्गांवर वाहतूककोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोलिसांनी पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविली. कोणत्याही जिल्ह्यात आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडली नाही असे अमरावती व नागपूर परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक नियंत्रण कक्षाने सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोंदिया शहरातील कुडवा चौक येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी रामनगर पोलिसांनी 13 चालकांना ताब्यात घेतले. बुलढाणा जिल्ह्यातदेखील ट्रकचालक आक्रमक झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूर-घोडसगावनजीक रस्त्यावर टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला. पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठत वाहतूक सुरळीत केली.

Edited by : Prasannaa Jakate

MSRTC Buses in Bhandara.
Nagpur : राज्य सरकारला ‘चुल्लुभर’ पाण्यात बुडून मरायची वेळ.. कोण म्हणालं असं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com