Maratha Aarakshan Andolan : निजामी मराठा सामान्य मराठ्यांना आरक्षण देऊ देणार नाही, आंबेडकरांचा थेट आरोप !

Maharashtra : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू पाहतोय.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Akola Politics News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे, तर आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यातील प्रस्थापित निजामी मराठ्यांनी सामान्य मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी काहीच केलं नाही, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. (The issue of Maratha reservation is currently seen as a turning point in the politics)

सामान्य मराठा जर स्वतःच्या पायावर उभा राहिला, तर निजामी मराठ्यांसाठी ते ‘चॅलेंज’ होईल. म्हणून प्रस्थापित निजामी मराठ्यांनी सामान्य मराठ्यांसाठी काहीच केलं नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर अकोल्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) 'इंडिया' आघाडीत सामील करण्यासाठी काँग्रेस का निमंत्रण देत नाही, या प्रश्‍नावर याचे उत्तर त्यांनीच द्यावं, असेही आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू पाहतोय. राज्यातील राजकारण तापलं असताना प्रकाश आंबेडकर यांनाही आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर सातत्याने सत्तेत असलेल्या मराठा नेत्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण देण्यासंदर्भात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही सामान्य मराठ्यांना आरक्षण मिळू नये, अशी असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

सामान्य मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, प्रस्थापित श्रीमंत मराठा समाजापेक्षा वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकर सातत्यानं असं वक्तव्य करून काही नवी राजकीय आघाडी करू पाहताहेत का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

आमचे शेत सोनिया गांधी यांच्या शेजारी नाही...

‘इंडिया’ आघाडीत सामील होण्यासाठी काँग्रेस आम्हाला का निमंत्रण देत नाही, हे आम्ही सांगू शकत नाही. याचं उत्तर काँग्रेसने द्यावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आमचं शेत सोनिया गांधी किंवा नाना पटोले यांच्या शेताला लागून नाही. त्यामुळे आमचं शेतीचंही भांडण नाही. त्यामुळे वंचितला आघाडीत का घेत नाही, याचा खुलासा काँग्रेसने करावा, असेही आंबेडकर या वेळी म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Prakash Ambedkar
Vanchit Bahujan Alliance News : ...आणि म्हणून 'वंचित'ने कृषी अधिकाऱ्यांना गाडीवर बसून फिरवले !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com