Maratha Mahasangha aggressive : शिंदे फक्त ‘कुंकवाचा धनी’, पुढच्या निवडणुकीत मराठा नेत्यांना पाडणार मराठा महासंघ !

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे सरकारमध्ये त्यांचे काहीही चालत नाही.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Nagpur Maratha - OBC Political News : मराठा आरक्षणाचा हा तिढा निर्माण होण्यासाठी आमचे मराठे नेतेच कारणीभूत आहेत. त्यामुळे आता आरक्षण न मिळाल्यास मराठा नेत्यांनाच पुढील नवीन निवडणुकीत त्यांच्या मतदार संघात जाऊन पाडणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केले. (Ministers and OBC leaders will not allow to move around the state)

मराठा आरक्षणावरून राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर जगताप यांनी आज (ता. १०) नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा असले तरी सरकारमध्ये त्यांचे काहीही चालत नाही. ते केवळ ‘कुंकवाचा धनी’ आहेत, असा जोरदार टोला त्यांनी लगावला. यावेळी मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी ओबीसी किंवा कुणबी समाजासोबत भांडण नको. सरकार मराठ्यांना आरक्षण देत असेल तर विरोध करू नका, असे आवाहन दिलीप जगताप यांनी केले. याचवेळी मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही आणि आंदोलनाला गालबोट लागले तर मंत्री, ओबीसी (OBC) नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) कुणबी, ओबीसींच्या भूमिकेवरून ते आज नागपुरात आले होते.

मराठा समाजाला आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण हवे आहे, यासाठी कुणबी, ओबीसींनी दिल्लीत केंद्र सरकारकडे सोबत यावे, असे आवाहन त्यांनी केले. ओबीसींसोबत आरक्षणासाठी कुठलेही भांडण नाही. सरकार आरक्षण देत असेल विरोध करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. मुळात मराठा व ओबीसींमध्ये भांडणे लावण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप त्यांनी केला. आता या दोन्ही समाजात समझोता करण्यासाठी भाजप (BJP) नेत्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

Eknath Shinde
Maratha Aarakshan Andolan : कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीला मान्य नाही वडेट्टीवारांचा ‘फॉर्म्युला’

जालन्यात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांचे काही बरे-वाईट झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला. ओबीसी नेत्यांनी आगीत तेल ओतू नये, आपसात भांडणे चांगले नाही. केंद्र सरकारने आता विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्यासाठी खासदारांना पत्र दिले आहे. त्यांनी या मुद्द्याला बगल दिल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.

फडणवीसांनी राजीनामा द्यावा..

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान लाठीमार करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले. केवळ माफी मागून भागणार नाही, त्यांनी राजीनामाच द्यायला हवा, अशी मागणी जगताप यांनी केली. आंदोलन मोडीत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु जरांगे पाटील यांना काही झाले तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्राचे मणिपूर करायचे असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com