Big Cheating : तेलंगणाचं कारण देत मराठा आरक्षण लांबणीवर जाणार

Maratha Reservation : नागपुरातील मोठ्या नेत्याचा ठाम दावा
maratha reservation
maratha reservationgoogle
Published on
Updated on

Nagpur News : राज्यातील सरकारचा मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा ईरादा नाही. सध्या सरकार मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मराठा समाजाला खेळवत ठेवेल. त्यानंतर तेलंगणाचा (Telangana) मुद्दा पुढे करीत आरक्षणाबाबतची सर्व प्रक्रिया लांबणीवर ढकलणार आहे, असा दावा नागपूर येथील एका बड्या नेत्यानं केलाय. आम्ही मराठा आरक्षण देण्याबाबत २०१३-१४ मध्येच भूमिका घेतली होती. पण सध्या सत्तेवर असलेले राज्यकर्ते केवळ मराठा समाजाची फसगत करीत आहेत.

आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाने महाराष्ट्र सरकारला दिलेली मुदत केव्हाच संपलीय. सरकारला खरच आरक्षण द्यायचे असते तर ईतके दिवस वाया घालवले नसते. आता सध्या सरकार फक्त पळवाट शोधत आहे. त्यामुळं गावबंदी करताना मराठा समाजानं सत्ताधाऱ्यांना आधी हाती धरावं असं आवाहनही या नेत्यानं केलं.

मराठा समाजातील प्रत्येकानं आता जागं झालं पाहिजे. सत्तेवर असणारे लोक तुमच्याशी दगाफटका करीत आहेत. त्यामुळे त्यांनाच गावबंदी करा, ईतरांना गावबंदी करून काहीही होणार नाही. त्याचे कारण म्हणजे फक्त सरकारला वेळ मारून न्यायची आहे, असा ठाम दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नागपुरात शुक्रवारी (ता.२७) बोलताना सांगितलं की, आता असे अनेक मुद्दे पुढे येतील जे मराठा आरक्षणाच्या आड येतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारने मराठा समाजाला वेळ मागितली होती. जी वेळ मागितली, त्या अवधीत राज्य सरकारने आरक्षण द्यायला हवं होतं. दिलेला शब्द खरा करायचा होता अन्यथा वाढीव मुदत मागायची असती. एखाद्याला शब्द दिल्यानंतरही तो पाळायचा नाही, याला काय अर्थ आहे, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेस मराठा आरक्षणाच्या बाजुनेच आहे. ईतकेच काय तर राहुल गांधी ‘जिसकी जितनी भागीदारी, उतनी उसकी हिस्सेदारी’ असं स्पष्टच सांगत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला हे तीनचाकी सरकार नाही तर काँग्रेसचं सरकार आरक्षण देईल, असा विश्वासही त्यांनी ठामपणे व्यक्त केला.

काँग्रेसनं देशात हरीत क्रांती घडविली. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना न्याय दिला. वेगवेगळ्या समाजांना आरक्षण दिलं. अगदी त्याच पद्धतीनं काँग्रेस पुन्हा सर्व समाजाला समतोल न्याय देईल. मराठा समाजातील नागरीकांनी, शेतकरी, शेतमजुरांनी, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करू नये, परंतु सत्ताधाऱ्यांना धडा नक्की शिकवावा असं आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी केलं.

(Edited by : Atul Mehere)

maratha reservation
Maratha Reservation : आमच्या गावात येऊन अपमान करून घेऊ नका; बुलडाणा जिल्ह्यात फलक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com