Dr. Ashok Jivtode and Others
Dr. Ashok Jivtode and OthersSarkarnama

Maratha Vs OBC Community : ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण सरकारने ‘या’ तीन गोष्टीही कराव्यात !

OBC : बिहारच्या धरतीवर जातीनिहाय जनगणना करावी.
Published on

Chandrapur Political News : मराठा आरक्षणावर सोमवारी (ता. ११) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक मुंबई येथे पार पडली. ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असे त्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांच्या चर्चेनंतर ठरले. हे चांगले झाले असले तरी आणखी काही गोष्टी ओबीसींसाठी करणे गरजेचे असल्याचे ओबीसी नेते आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे म्हणाले. (A caste-wise census should be conducted like Bihar)

ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व सर्वपक्षीय नेत्यांनी निर्णय घेतला आहे. आता बिहारच्या धरतीवर जातीनिहाय जनगणना करावी. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करावे व स्वाधार योजना सुरू करावी या तीन गोष्टी तातडीने करणे गरजेचे असल्याचेही डॉ. जिवतोडे म्हणाले.

यासंदर्भात डॉ. जिवतोडे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली आणि नागपूरच्या (Nagpur) संविधान चौकात सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात ते सहभागी झाले. यानंतर मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी (OBC) समाजाला चर्चेसाठी बोलवावे, असे पत्रदेखील देण्यात आल्याचे ते म्हणाले.

चंद्रपूरमध्ये ओबीसी प्रवर्गातील सर्व समाज एकवटले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट असलेल्या जातींच्या लोकांचे नुकसान होऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लढा उभारला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात हा लढा निश्‍चितपणे यशस्वी होईल, असेही डॉ. जिवतोडे म्हणाले.

विदर्भात नागपूर, चंद्रपुरातून आंदोलनाला सुरुवात झाली. गरज पडल्यास हे आंदोलन चांद्यापासून बांद्यापर्यंत करण्यात येईल. पण ओबीसींवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्व शाखीय कुणबी संघटना आणि ओबीसी संघटनांची बैठक झाली.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला सर्वांचाच विरोध आहे. या लढ्यामध्ये आता तेली आणि माळी समाजही रस्त्यावर उतरला आहे. एकंदरीतच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा लढ्याचे बळ दिवसागणिक वाढत चालले आहे, असेही डॉ. अशोक जिवतोडे यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Dr. Ashok Jivtode and Others
...तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ मोठे आंदोलन छेडणार : डॉ. जिवतोडे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com