Maratha Vs OBC Community : मराठ्यांच्या नावावर नोकर भरती रद्द करू नये, ओबीसींसाठी आमदार अग्रवालही मैदानात !

OBC Reservation : ओबीसी आरक्षण अबाधित राखण्याचा लढा तीव्र होताना दिसतो आहे.
Vinod Agrawal
Vinod AgrawalSarkarnama
Published on
Updated on

Gondia Political News : आरक्षण अबाधित राखण्यासाठी आक्रमक झालेल्या राज्यातील ओबीसी समाजाला खूश करण्यासाठी जिल्ह्यातील नेते सरसावले आहेत. येनकेन प्रकारे आपणच ओबीसी समाजाचे कैवारी आहोत, अशी प्रतिमा जिल्ह्यातील आमदार तयार करताना दिसत आहेत. (The fight to keep the OBC reservation intact seems to be intensifying)

डॉ. परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांच्यानंतर गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनीही ओबीसी समाजाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. आरक्षणाला हात लावाल, तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण अबाधित राखण्याचा लढा तीव्र होताना दिसतो आहे. मराठा आरक्षणाच्या नावावर नोकर भरती रद्द करून ओबीसींसह इतर प्रवर्गावर अन्याय करू नये, असे खडे बोल आमदार विनोद अग्रवाल यांनी सरकारला सुनावले आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) सरकार जेव्हा जेव्हा मेगा भरती करते, त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पुढे केला जातो आणि मोठ्या प्रमाणात होणारी नोकर भरती रद्द केली जाते. असा घणाघाती आरोप आमदार अग्रवाल यांनी केला आहे. महाराष्ट्र शासन जेव्हा नोकरी भरतीची जाहिरात देते आणि त्याच्यानंतर कालांतराने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुढे केला जातो आणि ती नोकरी भरती रद्द केली जाते.

गेल्या सात वर्षांपासून हा प्रकार निरंतर सुरू आहे. आता नुकतीच नोकर भरतीला सुरुवात झाली आहे. जर सरकारने मराठा आरक्षणाच्या नावावर कोणतीही नोकर भरती रद्द केली तर याविरुद्ध आंदोलन करून सरकारला धारेवर धरण्यात येईल, इशारा आमदार अग्रवाल यांनी दिला. आज अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. ते रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.

सरकारने आरक्षण च्या नावावर भरती रद्द करू नये. त्यामुळे ओबीसी आणि बहुजन समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होईल. दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, याला कुणाचाही विरोध नाही. मात्र ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, अशी ठाम भूमिका आमदार अग्रवाल यांनी घेतली आहे. दरम्यान त्यांनी ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्नही मांडला आहे. सरकारने किमान भाड्याने वसतिगृह घेऊन चालवावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

दरम्यान ओबीसी समाजाची जनगणना व्हावी, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी सरकारला केली आहे. प्रत्येक प्रवर्गाचे आरक्षण हे त्यांच्या लोकसंख्येवरून दिले गेले आहे. असे असताना ओबीसी समाजाला आरक्षण त्याच्या लोकसंख्येप्रमाणे दिले गेले नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची जनगणना करावी व त्यानुसार आरक्षण द्यावे, या मागणीसाठीही आमदार अग्रवाल मैदानात उतरले आहेत.

Edited By : Atul Mehere

Vinod Agrawal
Parinay Fuke On Kunbi : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांचा कडाडून विरोध !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com