मराठी नाट्य चळवळ नक्कीच मोठी होईल, मुनगंटीवारांनी प्रशांत दामलेंना केले आश्‍वस्थ...

जागतिक मराठी नाट्यधर्मी या संस्थेच्यावतीने अभिनेते प्रशांत दामले यांनी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची नुकतीच विधानभवन येथे भेट घेतली.
Sudhir Mungantiwar and Prashant Damle
Sudhir Mungantiwar and Prashant DamleSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राज्यातील (Maharashtra) ५२ नाट्यगृहे सर्व सोयी सुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत दोन्ही बाजूचा विचार करून मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी, अशी मनापासून इच्छा आहे आणि यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग कटिबद्ध आहे. यासंदर्भात एक बैठक लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यधर्मीचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना दिले.

मंत्री मुनगंटीवार यांनी विभागाला तशा सूचनाही दिल्या. जागतिक मराठी नाट्यधर्मी या संस्थेच्यावतीने अभिनेते प्रशांत दामले यांनी सुधीर मुनगंटीवार यांची नुकतीच मुंबई (Mumbai) विधानभवन येथे भेट घेतली. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार संजय केळकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव थोरात, उपसचिव विद्या वाघमारे, पुरातत्त्व विभागाचे संचालक गर्जे यांची उपस्थिती होती. या बैठकीत प्रशांत दामले यांनी राज्यातील नाट्यगृहांची स्थिती आणि उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अडचणी दूर करून नाट्यगृह अधिक उत्तम व आदर्श करण्याच्या दृष्टीने सूचना द्याव्यात, असे सांगून या संदर्भातील तज्ज्ञ व कलावंत यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्याची तयारी दर्शविली. नाट्यगृहात सोलर व्यवस्था व्हावी अशी सूचनाही केली. तज्ज्ञांकडून सूचना आल्यानंतर त्यासंदर्भात गरज भासल्यास सांस्कृतिक विभागाकडून येणाऱ्या अधिवेशनात निश्चितच पुरवणी मागण्यांद्वारे निधीची तरतूददेखील केली जाईल, असेही त्यांनी आश्वस्थ केले. मंत्री मुनगंटीवार यांच्यासोबत झालेली चर्चा यशस्वी झाली आणि त्याचे समाधान आहे, असे प्रशांत दामले यावेळी म्हणाले.

Sudhir Mungantiwar and Prashant Damle
मुनगंटीवार खवळले; म्हणाले, यासाठी आपल्या पिताश्रींना लाज वाटली पाहिजे, असे म्हणायचे का?

मराठी नाटकांसाठी नाट्यगृह सवलतीच्या दरात !

कोरोनाच्या काळात मराठी नाटक आणि कलावंत यांच्यावरदेखील इतर क्षेत्रांप्रमाणे आर्थिक संकट कोसळले. आता कुठे हे क्षेत्र रुळावर येऊ लागले आहे, तरीदेखील सहकार्य अपेक्षित असून सवलतीच्या दरात मराठी नाटकांना नाट्यगृहे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रशांत दामले यांनी यावेळी केली. याला तात्काळ प्रतिसाद देत सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील नाट्यगृहे जून २०२३ पर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी चर्चा केली आणि श्री चहल यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सवलतीचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com