Bhandara Administration : सत्ताधारी आमदाराच्या मतदारसंघात मिळेना अधिकारी, अनेक पदं रिक्त बहुतांश प्रभारी

MLA Raju Karemore : मनुष्यबळ नसल्यानं रखडलाय ग्रामविकास
Tumsar Panchayat Samiti
Tumsar Panchayat SamitiSarkarnama
Published on
Updated on

Zilla Parishad & Panchayat Samiti : एकाच तालुक्यात किती पदं रिक्त असू शकतात, याची कल्पना केलीय का कधी? नसेल केली तर एकदा भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात फेरफटका मारून बघा. येथे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोर यांच्या मतदारसंघातील अनेक पदं रिक्त आहेत. बहुतांश पदांचं कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. सर्वाधिक पदं रिक्त आहेत पंचायत समितीमध्ये.

तुमसर मतदारसंघाला सध्या रिक्त पदं आणि प्रभारी अधिकाऱ्यांमुळं ग्रहणच लागलंय. खंडविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक अशी अनेक पदं रिक्त आहेत. नोकरभरती बंद असल्याचा फटका तुमसरला सहन करावा लागतोय. (Maximum Number of Vacant Posts in Tumsar of Bhandara District an constituency of ruling NCP MLA Raju Karemore)

सध्या या तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्यांची ७, ग्रामसेवकांची १६ पदं रिक्त आहेत. येथे प्रभारींच्या भरवशावर काम सुरू आहे. ग्रामीण भागातील कामांवर त्याचा चांगलाच परिणाम होतोय. ग्रामीण भागांसाठी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी महत्त्वाचे असतात. खंडविकास अधिकाऱ्यांसह १६ ग्रामसेवक व ७ ग्रामविकास अधिकारी प्रभारी आहेत. एका ग्रामसेवकाकडं तीन ते चार गावांचा प्रभार देण्यात आलाय. त्यामुळं कर्मचाऱ्यांचा जीवही मेटाकुटीस आलाय.

मोठ्या गावांमध्ये सात ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत. त्यात सिहोरा, डोंगरी बुद्रुक, आष्टी, चुल्हाड, नाकाडोंगरी, लोभीव सीतासावंगी या गावांचा समावेश आहे. महालगाव, सुकळी (न.), देवरीदेव, गोंदे खारी, गोंडीटोला, हरदोली, बपेरा (आंबागड), सोंड्या, वारपिंडकेपार, धुटेरा, मोहगाव खदान, खैरलांजी, आसलपाणी, चांदपूर, सिंदपुरी, सिलेगाव, साखळी कर्कापूर, पांजरा, रेंगे पार, रोंघा,बोरी, बपेरा(सि.) या गावांमध्ये ग्रामसेवक नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या चार महिन्यांपासून खंडविकास अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत. भंडारा येथील खंडविकास अधिकारी माणिक चव्हाण यांच्याकडं तुमसरचा प्रभार देण्यात आलाय. ते आठवड्यातून येथे केवळ एक दिवस येतात. तालुक्यातील नागरिकांना खंडविकास अधिकारी नेमक्या कोणत्या दिवशी येतात, याची माहितीही नसते. त्यामुळं अनेकांना आठवडाभर अधिकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागते.

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका हा क्रमांक दोनचा तालुका आहे. तालुक्यात ९७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १६ ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांची पदं रिक्त आहे. सात ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदंही रिक्त आहेत. त्यामुळं एका ग्रामसेवकाला तीन ते चार गावांचं कामकाज बघावं लागतं. काहींकडं अधिकारी पदाचाही प्रभार आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटलं जातं. त्या खालोखाल पंचायत समितीचा क्रमांक लागतो. परंतु अधिकारीच नसल्यानं ग्रामविकास होईल तरी कसा, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Edited by : Prasannaa Jakate

Tumsar Panchayat Samiti
Bhandara Farmer Protest : सरकार शेतकऱ्यांसाठी काही नाही करणार, स्वार्थासाठी एक दिवस भारतमातेलाही विकणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com