Amol Mitkari News: एमआयडीसी व रोजगाराचा प्रश्न गाजला; मिटकरी म्हणाले, विदर्भावरही लक्ष द्या!

Uday Samant's Answer on Amol Mitkari's Questions: अकोल्यासारख्या जिल्ह्यात १०० टक्के कापूस उत्पादक शेतकरी आहेत.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama

Akola News: महाराष्ट्रात विदर्भ व विदर्भात अकोला जिल्हा आहे. येथे १०० टक्के शेतकरी कापूस उत्पादक आहे. मात्र, एकही टेक्सटाईल उद्योग नाही. मंत्री महोदय तुम्ही विदर्भावर लक्ष द्या व एकदा अकोल्यात येऊन येथील एमआयडीसी बघा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज विधान परिषदेत लावून धरली.

एमआयडीसी विकास व रोजगार निर्मितीचा प्रश्नावरील चर्चेत आमदार मिटकरी सहभागी झाले होते. दिवंगत कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पश्चिम विदर्भात टेक्सटाईस पार्क उभारण्याचे स्वप्न बघितले होते. त्यादृष्टीने पाऊलही टाकले होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर हा प्रकल्प मागे पडला. आज अकोल्यासारख्या जिल्ह्यात १०० टक्के कापूस उत्पादक शेतकरी असतानाही त्यांच्या कापसावरू प्रक्रिया करणारा एकही उद्योग नाही.

एमआयडीसीतील आहे ते उद्योगही बंद पडत आहे. उद्योग नसल्याने रोजगार नाही. रोजगार नसल्याने वित्त नाही आणि वित्त नाही म्हणून गुन्हेगारी वाढते आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी विदर्भाच्या विकासावर लक्ष द्यावे व एकदा अकोल्यात येऊन येथील एमआयडीसीला भेट द्यावी. येथे कापूस प्रक्रिया उद्योग व टेक्सटाईल पार्क उभारणार आहात काय, असा प्रश्न आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी उद्योग मंत्री उदय सावंत यांना विचारला.

Amol Mitkari
Amol Mitkari News : अकोला लोकसभा लढण्याची आमदार मिटकरींची तयारी!

उत्तर देताना मंत्री सावंत (Uday Samant) म्हणाले की, आतापर्यंत कॅबिनेटची सब कमिटीच नव्हती. या कमिटीत उद्योगांनी दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबाबत निर्णय घेतला जातो. सध्या ही समिती गठीत करण्यात आली आहे. त्यातून ६० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक असलेल्या उद्योगांना मंजुरी देण्यात आली आहे. अकोल्याबाबतही (Akola) सरकार सकारात्मक भूमिका घेईल. इंडोनेशिया येथील २० हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com