Bazar Samiti Result : गोंदिया बाजार समितीवर आमदार अग्रवलांचा माजी मंत्री प्रफुल पटेलांना धक्का

NCP and BJP : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पॅनलचा पराभव
Vinod Agrawal
Vinod AgrawalSarkarnama
Published on
Updated on

Gondia Bazar Samiti : राज्यात शुक्रवारी (ता. २८) १४७ कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी मतदान झाले आहेत. यातील काही बाजार समितींची मतमोजणी होऊन निकालही जाहिर झाले आहेत. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्रफुल पटेल आणि माजी पालकमंत्री परिणय फुके यांना धक्का बसला आहे. या बाजार समितीवर चाबी व काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलने वर्चस्व निर्माण केले आहे.

Vinod Agrawal
Jawali APMC : त्यांच्या हट्टीपणामुळे निवडणूक; आता आत्मपरिक्षण करा : शिवेंद्रराजेंचा दीपक पवारांना टोला

चाबी संघटनेचे प्रमुख अपक्ष आमदार विनोद अग्रवाल (Vinod Agrawal) यांनी काँग्रसच्या मदतीने गोंदिया बाजार समिती (Gondia BAzar Samiti) दणदणीत विजय मिळविला आहे. या बाजार समितीत यापूर्वीच एक जागा बिनविरोध निवडून आलेली आहे. त्यानंतर १७ जागांसाठी मतदान झाले. त्यात १३ जागा आमदार अग्रवाल आणि काँग्रेसच्या पॅनलने जिंकल्या आहेत.

Vinod Agrawal
Mukhtar-Afzal Ansari Conviction: मुख्तार अन्सारीला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि काँग्रेसच्या पॅनलने १८ पैकी १४ जागा ताब्यात घेतल्या आहेत. शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) एक जागा मिळाली आहे. तर माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहाकरी पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

Vinod Agrawal
Parbhnai APMC Result News : बोर्डीकरांनी जिंतूर-बोरीत विजय मिळवला, जिल्ह्यात महाविकास आघाडीचीच सरशी..

या निवडणुकीतील राष्ट्रवादी आणि भाजपचा पराभव हा थेट प्रफुल पटेल (Praful Patel) आणि माजी पालकमंत्री परिणय फुके यांना बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, यापूर्वी बाजार समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यावेळी मात्र अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि काँग्रेस यांनी हात मिळवून बाजार समितीवर विजय मिळविला असून ते सत्ता स्थापना करणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com