Bachchu Kadu accident news : आमदार बच्चू कडू यांचा अपघात ; डोक्याला गंभीर दुखापत

Bachchu Kadu accident news : रस्ता ओलांडत असताना त्यांचा अपघात झाल्याची माहिती आहे.
Bachchu Kadu accident news
Bachchu Kadu accident newssarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu accident news : आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रस्ता ओलांडत असताना त्यांचा अपघात झाल्याची माहिती आहे. त्यांना अमरावतीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. आज सकाळी सहा ते साडेसहा वाजता हा अपघात झाला. सकाळी रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली.

बच्चू कडू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून डोक्याला चार टाके पडले आहेत. आज सकाळी रस्ता ओलांडत असताना बच्चू कडू यांना दुचाकीस्वाराने भीषण धडक दिली. यामध्ये बच्चू कडू रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली. बच्चू कडू यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, शिंदे गटाचे नेते, माजी मंत्रीचे रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांचा अपघात झाला होता. आज झालेल्या कडू यांच्या अपघातामुळे राजकीय नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरुच असल्याचे दिसते.

जयकुमार गोरे हे हिवाळी अधिवेशनावरुन परत येत असताना फलटण जवळ येथे त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर सध्या पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

तर गेल्या मंगळवारी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी आणि कामे आटपून घरी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने धनजंय मुंडे यांच्या कारला अपघात झाला होता. परळीतील मौलाना आझाद चौकात हा अपघात झाला असून याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनीच प्रसारमाध्यमाद्वारे दिली होती

Bachchu Kadu accident news
BJP News : नऊ राज्य जिंकण्यासाठी भाजपची रणनीती ठरली ; साडेतीन हजार संघटक मैदानात उतरणार

मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पुढील उपचारासाठी मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.यासाठी लातूरहून एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंडे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले होते.

आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (६ जानेवारी) रात्री भीषण अपघात झाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ हा अपघात घडला. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. आमदार कदम यांना किरकोळ मार लागला होता.

योगेश कदम म्हणाले, “मी मुंबईला जात असताना माझा अपघात झाला. रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला. परंतु, आई जगदंबेच्या कृपेने आणि जनतेच्या आशिर्वादाने मी व माझे सर्व सहकारी या अपघातातून सुखरुप बचावलो आहोत.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com