आमदार बावनकुळे म्हणाले, ‘यामुळे’ छगन भुजबळांना खोटं बोलावे लागतंय…

या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी जनतेने (OBC People) मतदानावर बहिष्कार टाकला आहे. लोकशाहीसाठी ही बाब अजिबात योग्य नाहीये, असेही आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule and Chagan Bhujabal

Chandrashekhar Bawankule and Chagan Bhujabal

Sarkarnama

नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये एक गट असा बसला आहे की, ज्यांना ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) द्यायचे नाहीये. त्यांना ओबीसींच्या जागांवर पैसेवाले सुभेदार नेमायचे आहेत. त्यामुळे ते लोक राज्य सरकारवर दबाव निर्माण करत आहेत. ओबीसी नेते छगन भुजबळही (Chagan Bhujbal) त्यांच्या दबावाखाली आले आहेत. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गमवायची वेळ आली आहे, असे ओबीसी नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

आमदार बावनकुळे म्हणाले, तीन महिन्यांत डेटा गोळा करणे शक्य आहे. आतापर्यंतचा वेळ राज्य सरकारच्या हेकेखोरपणामुळे वाया गेला. त्यामुळेच आज आरक्षण गेले आहे. आम्ही ओबीसींचं आरक्षण वाचवण्याचं काम केलं, पण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेलंय. आता तरी देवानं या सरकारला सुबुद्धी द्यावी. राज्य सरकार आता तोंडघशी पडले आहे. आम्ही वारंवार सांगत आलो की केंद्र सरकारकडे असलेला डेटा सदोष आहे. शेवटी सिद्धही तेच झालं.

आतापर्यंत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आलं आहे. पण आता या लोकांना तीसुद्धा जागा राहिली नाही. दोन वर्ष सरकारनं ओबीसी आरक्षणाच्या विषयात चालढकल केली, टाळाटाळ केली. आता या सरकारमधले मंत्री, स्वतःला ओबीसी नेते म्हणवणारे विदर्भातील नेते कोणत्या तोंडाने ओबीसी जनतेपुढे जातील? ओबीसी जनता या लोकांना रस्त्यावर फिरू देणार नाही, हे यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आम्ही आता राज्यभर आंदोलन पेटवणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातालुक्यांत आंदोलनाचा भडका आता उडणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Chandrashekhar Bawankule and Chagan Bhujabal</p></div>
मोठी बातमी : ओबीसी आरक्षणाशिवायच उडणार निवडणुकांचा धुराळा

आताही तीन महिन्यांमध्ये इम्पिरीकल डेटा तयार होऊ शकतो. सरकारजवळ आताही वेळ आहे. आता त्यांनी वेळकाढू धोरण घेऊ नये आणि तसे केले तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहो. मंत्र्यांनी लक्षात ठेवावे, त्यांच्या गाड्याही आम्ही रस्त्यांवर फिरू देणार नाही. १६ महिन्यांपासून मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, त्यांना ओबीसी आरक्षणाचं देणेघेणं नाही. अशा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आता ओबीसी जनता एकवटणार आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी जनतेने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. लोकशाहीसाठी ही बाब अजिबात योग्य नाहीये, असेही आमदार बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com