आमदार भुयारांनी खासदार राऊतांना दिली लग्नाची पत्रिका, राजकीय चर्चा नाही…

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासोबत दीड तास बंद द्वार चर्चा झाली. त्यामुळे विदर्भात सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
MP Sanjay Raut with MLA Devendra Bhuyar
MP Sanjay Raut with MLA Devendra BhuyarSarkarnama

अविष्कार देशमुख

नागपूर : विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत शहरात तळ ठोकून होते. याच घडामोडी दरम्यान मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची खासदार संजय राऊत यांच्यासोबत दीड तास बंद द्वार चर्चा झाली. त्यामुळे विदर्भात सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच शरद पवार (Sharad Pawar) एका कार्यक्रमानिमित्त नागपूरात (Nagpur) आले होते. त्यांचा मुक्कम वर्धा (Wardha) मार्गावरील हॉटेल रेडीसनमध्ये होता. त्याच हॉटेलमध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) देखील थांबले होते. पवार यांनी नियोजित कार्यक्रमापूर्वी शहरातील कार्यकत्यांसोबत बैठक घेतली. तर संजय राऊत यांनीदेखील विदर्भातील शिवसेनीकांच्या भेटीगाठी घेतल्या. विदर्भात शिवसेनातील फुट सांभाळण्यासाठी ते शिवधनुष्य पेलत आहेत. या सर्व घडामोडीत आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) व संजय राऊत यांच्यात तब्बल दीड तास बंद द्वार चर्चा झाली. शुक्रवारी दुपारी चार वाजता आमदार भुयार राऊत थांबलेल्या हॉटेलच्या खोली क्रमांक ४३८ मध्ये पोहचले आणि थेट साडेपाच वाजता बाहेर पडले.

या भेटीसंदर्भात आमदार भुयार म्हणाले, खासदार संजय राऊत हे नागपूरात आले असता मी त्यांची नेहमीच भेट घेत असतो. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पक्षप्रवेशाचा मुद्दाच नाही. पूर्वी मला भारतीय जनता पक्षाकडून ऑफर होती. मात्र मी गेलो नाही. शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच नाही. मी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला असून मी अखेरपर्यंत पवार साहेबांसोबत असणार आहे. राऊत यांच्या भेटीदरम्यान विदर्भातील औद्योगिक, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. येथील कापूस, संत्रा शेतकऱ्यांबद्दलची माहिती राऊत यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय विदर्भात भाजपाविरूध्द कसे आक्रमक पावले उचलायची या बद्दलची रणनीती ठरवण्यात आल्याचेही ते म्हणाले. यावेळी मी त्यांना माझ्या लग्नाची पत्रिकाही दिल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी नरखेड पंचायत समितीचे सदस्य मयूर उमरकर उपस्थित होते.

MP Sanjay Raut with MLA Devendra Bhuyar
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा , भावी पत्नी आहे डाॅक्टर!

खासदार संजय राऊत हे नागपूरात आले असता मी नियमीत त्यांची भेट घेत असतो. शुक्रवारी मी त्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राज्यातील अनेक अपक्ष आमदार फुटले मात्र मी आजही शरद पवार साहेबांसोबतच आहो आणि नेहमी राहील, असे आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.

राऊतांकडून कौतुक..

महाविकास आघाडी सरकार कोसळताच विदर्भातील सर्व अपक्ष आमदर शिंदे गटात गेलेत. भुयार यांना देखील शिंदे गटाकडून संपर्क करण्यात आला होता. परंतु भुयार यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. विशेष म्हणजे राज्यसभेच्या निवडणूकीत भुयार यांचे मत फुटल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. आज त्याच राऊतांनी महाविकास आघाडी प्रति निष्ठा दाखवल्याबद्दल भुयार यांचे कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com