MLA Deshmukh News : काहीही झाले तरी उद्या सकाळी फडणवीसांच्या घरासमोर टॅंकरसह धडकणार आमदार देशमुख !

Nagpur : नागपूरच्या वेशीवर पोहोचले पण संघर्ष पदयात्रेला नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारली.
MLA Nitin Deshmukh at Dhamna
MLA Nitin Deshmukh at DhamnaSarkarnama

Water Struggle Walk to Nagpur : अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नागपूरपर्यंत पाणी संघर्ष पदयात्रा काढली आहे. नागपूरच्या वेशीवर पोहोचले असून त्यांच्या संघर्ष पदयात्रेला नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पण काहीही झाले तरी उद्या सकाळी फडणवीसांच्या घरासमोर खाऱ्या पाण्याचा टॅंकर उभा करणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. (A salt water tanker will be set up in front of Fadnavis' house)

उद्या सकाळी आमदार देशमुख यांच्या नेतृत्वात उद्या सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र नागपूर पोलिसांनी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न लक्षात घेता फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. ठाकरे सरकारच्या काळात अकोला जिल्ह्यातील मंजूर झालेल्या जलवाहिनी योजनेला स्थगिती दिल्याने संघर्ष पदयात्रा सुरू करण्यात आली आहे.

नागपूर-अमरावती मार्गावरील धामणा या गावापर्यंत ही पदयात्रा पोहोचली आहे. आज रात्री नागपुरात पोहोचून उद्या सकाळी आंदोलन सुरू करण्याचे आंदोलकांचे नियोजन आहे. दरम्यान नागपूर विशेष शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जगताप यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना सूचनापत्र दिले आहे. त्यानुसार आंदोलकांना देवेंद्र फडणीस यांच्या घरासमोर एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

आंदोलनासंदर्भात आमदार देशमुख म्हणाले. अकोला जिल्ह्यात ६० टक्के खारपान पट्ट्याचा भाग आहे. यासंदर्भात तत्कालीन सरकारमध्ये असताना विदर्भाच्या आमदारांची बैठक घेतली होती. त्यानंतर जिल्ह्यातील लोकांना पाणी मिळण्यासाठी २५० कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आखली. त्याचे काम सुरू झाले. तब्बल १५० कोटी रुपये खर्च झाल्यानंतर त्याला स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली.

MLA Nitin Deshmukh at Dhamna
Nitin Deshmukh : पंतप्रधान मोदींच्या फोटोमुळे शिवसेनेला तोटाच; नितीन देशमुखांनी मांडलं गणित

ही योजना पूर्ण करावी, यासाठी मी उपोषणाला बसलो होतो. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले ही कोणती प्रथा आहे? गुन्हे दाखल करतो. आम्ही पाणी संघर्ष पदयात्रा काढू नागपूरकडे (Nagpur) निघालो तेव्हा सरकारने (State Government) आमच्यावर गुन्हे दाखल केले. हा अन्याय आहे. दोन हजार टीडीएसचे पाणी महिला पिते.

बाळ जन्माला आल्यावर तिसऱ्या दिवशी बाळाला हेच पाणी पाजते. हे होऊ नये आणि सुदृढ पिढी घडावी, यासाठी ती योजना होती. पण त्या योजनेला फडणवीसांनी (Devendra Fadanvis) स्थगिती दिली. २५००० महिलांनी लोटा लोटा पाणी घेऊन टॅंकर भरला आणि तो टॅंकर आम्ही फडणवीसांच्या घरासमोर नेऊन आंदोलन करणार आहोत, असे आमदार देशमुख (Nitin Deshmukh) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com