आमदार धानोरकर म्हणाल्या, नदीकाठावरील नागरिकांना तात्काळ इतरत्र हलवा…

दरवर्षी तोच कित्ता गिरवण्यापेक्षा एकदाच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या, असे आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhaorkar) यांनी सांगितले.
MLA Pratibha Dhanorkar with officers
MLA Pratibha Dhanorkar with officersSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : गेल्या ५ दिवसांपासून विदर्भात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुराच्या पाण्यात वाहने वाहून जाऊन अनेकांचे जीव गेले आहेत. नदी, तलावांकाठी राहणाऱ्या लोकांना अद्यापही घरे सोडलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका आहे. त्यामुळे अशा लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Prathbha Dhanorkar) यांनी प्रशासनाला दिल्या.

पुढे दोन दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. परंतु अनेक ठिकाणी नागरिकांनी आपली घरे सोडली नाही. हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा वेळी प्रशासनाने तात्काळ ॲक्शन घेऊन संभाव्य संपत्ती आणि जीवित हानी टाळावी, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर १४ घरांतील नागरिकांना महसूल व नगर परिषदेच्या (Nagar Parishad) माध्यमातून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

काल आमदार प्रतिभा धानोरकर यांनी डोलारा तलाव व चिरादेवी रेल्वे भागाची पाहणी केली. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार सोनवणे, नगरसेवक चंदू खारकर, नगरसेविका प्रतिभा सोनटक्के यांची उपस्थिती होती. यावेळी गावांतील नागरिकांनी त्यांना आपल्या समस्या सांगितल्या. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येतात. दरवर्षी तोच कित्ता गिरवण्यापेक्षा एकदाच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या, असे आमदार धानोरकर यांनी सांगितले.

MLA Pratibha Dhanorkar with officers
आता आणखी काय-काय विकणार आहात : आमदार प्रतिभा धानोरकर

पूर परिस्थिती भागात वेकोलि व रेल्वे विभागाने सुद्धा मदत करण्याच्या सूचना आमदार धानोरकर यांनी दिल्या. चोरादेवी रेल्वे पुलाखाली पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत पडली होती. ते पाणी तात्काळ रेल्वे विभागाने काढण्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे विभागाचे पथक याठिकाणी येऊन हा मार्ग पुन्हा रहदारीकरिता मोकळा करणार आहे. भविष्यात देखील अशा प्रकारे हा मार्ग बंद पडता कामा नये. त्याकरिता उपाययोजना करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. या भागात पूर परिस्थितीमुळे कुठल्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास तात्काळ मदत करण्याच्या सूचना महसूल विभागाला आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या. नागरिकांनी देखील आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com