बंब यांचे मानसिक संतुलन ढासळले; सरनाईक यांची जहरी टीका

भाजप (BJP) आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत
Kiran Sarnaik, Prashant Bamb
Kiran Sarnaik, Prashant Bambsarkarnama

सिंदखेड राजा : विधानसभेत कमी शिकलेले आमदार असायचे. त्यामुळे शिक्षक, प्राध्यपकांचे प्रश्न मांडण्यासाठी या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. आता बहुतांश आमदार हे शिकलेले, सुशिक्षित आहेत. त्यामुळे शिक्षक, मराठावाडा पदवीधर मतदारसंघाची गरज राहिलेली नाही, असा दावा भाजप (BJP) आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी केला होता. त्यावर त्यांना अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार अॅड. किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांनी प्रत्युत्तर दिले.

सरनाईक सिंदखेड राजा येथे बोलत होते. यावेळी सरनाईक म्हणाले, आमदार प्रशांत बंब यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे, असा टोला लगावला. तसेच बंब यांचा विषय निवडणूक आयोगाशी संबधीत आहे. त्यासाठी तो विषय त्यांनी त्यांच ठिकाणी लावुन धरावा, असा सल्लाही सरनाईक यांनी दिला. बंब यांनी शिक्षक, पटवारी, ग्रामसेवक यांच्याबद्दल अपशब्द काढले. त्यामुळे अनेक संघटना त्यांचा विरोध करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Kiran Sarnaik, Prashant Bamb
सत्तेच्या सरिपाटात अडकली विद्यापीठे; कुलगुरूंची निवड आता जुन्या कायद्यानुसार

अधिवेशनामध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. आमदार काळे यांच्या प्रश्नाला सर्व शिक्षक आमदारांनी समर्थन दिले होते. प्रशांत बंब यांनी शिक्षक व ग्रामसेवक यांच्या बद्दल अपशब्द वापरले, त्याचा निषेध सभागृहामध्येही करण्यात आला आहे. सभागृहातून त्यावेळी सर्व शिक्षक आमदार बाहेर निघून गेले होते. त्याचबरोबर सभागृहाच्या पायऱ्यांवर शिक्षक व पदवीधर आमदार यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता, असे सरनाईक यांनी सांगितले.

Kiran Sarnaik, Prashant Bamb
अमित शहांना भेटणार का? शिंदे म्हणाले, सरकारमध्ये तर त्यांचा महत्त्वाचा...

दरम्यान, मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणारे शिक्षक शासनाची फसवणूक तर करतच आहे. पण आमच्या पिढ्या देखील बरबाद करत आहेत, असा गंभीर आरोप आमदार बंब यांनी केला होता. शिक्षकांच्या चुकीच्या गोष्टींवर पांघरून घालणारे शिक्षक व मराठवाडा मतदारसंघच रद्द करून टाका, अशी मागणी त्यांनी केली होती. शिक्षक संघटनांनी बंब यांच्या विरोधात आंदोलन केल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com