Washim News : ‘युवा संघर्ष’च्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नवचैतन्याची लहर

Rohit Pawar : पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह; निवडणुकीसाठी कसली कंबर
MLA Rohit Pawar at Washim.
MLA Rohit Pawar at Washim.Sarkarnama
Published on
Updated on

Yuva Sangharsha Yatra : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. पवार यांच्या यात्रेला अपेक्षेनुरूप तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातून शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शनही झालं.

यात्रेच्या माध्यमातून जे काही साध्य करायचं होतं, त्यात रोहित पवार काही अंशी यशस्वी झाल्याचं चित्र सध्यातरी वाशिम जिल्ह्यात बघायला मिळत आहे. (MLA Rohit Pawar Of NCP Sharad Pawar Group Succeeded In His Plans Through Yuva Sangharsha Yatra)

MLA Rohit Pawar at Washim.
Washim : पुरोगामी विचारांसोबत राहिले असते, तर दादा लोकांचे मुख्यमंत्री झाले असते

वाशिम जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, पक्षातील फुटीनंतर दोन गटांत विभागलेल्या राष्ट्रवादीचा अजित पवार गट जिल्ह्यात सरस ठरला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाची कास धरली आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वर्चस्व निर्माण झालं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शरद पवार गट विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. विधानसभेच्या तीन जागांपैकी दोन भाजपकडं आणि एक काँग्रेसकडं आहे. असे असताना वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला ताकद व नवसंजीवनी देण्याचं काम आमदार रोहित पवार यांनी केलं.

युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं त्यांनी शरद पवार व अजित पवार दोन्ही गटांतीन नेत्यांशी संपर्क साधला. काँग्रेसचेही काही नेतेही आमदार पवार यांच्या संपर्कात होते. आमदार पवार यांनी यात्रेच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधला. त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. यात्रा आटोपली असून, आता कार्यकर्त्यांमध्ये नवउत्साह संचारलेला पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला उभारी देण्यात ही यात्रा कितपत यशस्वी होईल हे लवकरच कळणार आहे. आगामी निवडणुकीत युवा संघर्ष यात्रेचा कितपत फायदा शरद पवार गटाला होतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवस यात्रेतून आमदार रोहित पवार यांनी तरुण मतदारांशी सर्वाधिक संवाद साधला. राज्यातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, हाताला काम नसणारे विद्यार्थी यांची आमदार पवार यांनी आवर्जून भेट घेतली. राज्यातील 13 जिल्ह्यांतून गेलेल्या या युवा संघर्ष यात्रेतून आमदार पवार यांनी युवा मतदार आकर्षित करण्याचा सर्वाधिक प्रयत्न केला आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात यात्रा दाखल झाली. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांशी आमदार पवार यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पवार यांची यात्रा 30 नोव्हेंबर दुसऱ्या दिवशी वाशिम शहरात पोहोचली. मोहजा येथेही आमदार पवार यांनी नागरिकांकडून तेथे असलेल्या अडचणींची माहिती घेतली. ग्रामीण भागातील युवकांनी संघटित व्हावं, असे आवाहन त्यांनी केलं. व्यावसायिकांसाठी सरकारनं धोरण निश्चिती करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. रिसोड मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अमित झनक यांनी वाशिम जिल्ह्यात रोहित पवार यांचे स्वागत केले. यात्रेच्या शेवटपर्यंत ते आमदार रोहित पवार यांच्या सोबत पायी चालत युवकांशी संवाद साधत होते. सलग दोन दिवस त्यांनी यात्रेत आपला सहभाग नोंदवला. दोघेही यात्रेत पक्षभेद विसरून युवकांच्या समस्या जाणून घेत होते.

Edited by : Prasannaa Jakate

MLA Rohit Pawar at Washim.
Washim Rohit Pawar : स्पर्धा परीक्षा शुल्कवाढीतून सरकार तरुणाईला लुटतंय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com