MLA Sameer Meghe रस्त्याची अवस्था बघून संतापले अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...

Cementing work : गेल्या वर्षभरापासून हिंगणा मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम मंदगतीने सुरू आहे.
MLA Sameer Meghe
MLA Sameer MegheSarkarnama
Published on
Updated on

Work speed is very slow : हिंगणा मार्गावर जागोजागी रस्ता बांधकाम सुरू आहे. कित्येक दिवसांपासून कामाची गती अतिशय मंद आहे. जागोजागी रस्ता खोदण्यात आला असून तो पूर्ववत करायलाच वर्षानुवर्षे लागतात का? नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे खडे बोल आमदार समीर मेघे (Sameer Meghe) यांनी अधिकारी व कंत्राटदाराला सुनावले.

गेल्या वर्षभरापासून हिंगणा मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम मंदगतीने सुरू आहे. यावेळी भाजप (BJP) डिगडोह मंडळाचे अध्यक्ष सुरेश काळबांडे यांनी आमदार समीर मेघें यांच्या लक्षात हिंगणा मार्गावरील रस्ता बांधकामाची परिस्थिती आणून दिली. त्यांना हिंगणा मार्गावर पाचारण करून त्यांना याबाबत अवगत केले. आमदार मेघे यांनी परिस्थितीचे अवलोकन करून अधिकाऱ्यांना यावेळी परिस्थितीची जाणीव करून दिली. रस्त्याचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नसून सर्वसामान्य माणूस, वाहनधारक, शाळांचे (Schools) व महाविद्यालयाच्या विद्यार्थी (Students) यापासून फारच त्रस्त आहे. या मार्गावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागते.

गेल्या सात-आठ महिन्यापासून रस्त्याकाठचा व्यापार ठप्प झालेला आहे. ऐन दिवाळीतही व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला फटका बसला. असे असताना जनतेच्या या अडचणीकडे लक्ष द्यायला कोणीच तयार नाही. आमदार मेघेंपुढे नागरिकांनी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. याप्रसंगी डिगडोह भाजप मंडळाचे अध्यक्ष सुरेश काळबांडे, डिगडोह प्राधिकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, माजी सरपंच दामोदरराव सांगोले, मेडिकल असोसिएशनचे बबनराव पडोळे, बाळासाहेब वाघमारे, दिवाकर दळवी, संजय वानखेडे, प्रदीप रोडे, काशीनाथ मापारी, व्यापारी संघटनेचे रवी जैन आदी उपस्थित होते.

MLA Sameer Meghe
आमदार समीर मेघे म्हणाले, ‘त्या’ ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करा...

रस्ता बांधकाम तातडीने सुरू करून पूर्ण करावे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला प्रचंड त्रास आहे. अपघाताची शक्यता नेहमीच असते. व्यापाऱ्यांची व्यवसाय उद्वस्त झालेला आहे. जर हे काम लवकर पूर्ण झाले नाहीतर आम्ही सर्व व्यापारी तीव्र आंदोलन करू.

-बबनराव पडोळे, मेडिकल असोसिएशन.

हिंगणा मार्गावरील रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत असल्यामुळे जनतेत प्रचंड रोष आहे. आमदार समीर मेघे यांनी सर्व परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी उद्या स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांशी भेटून काय ती अडचण समजून घ्यावी व लवकरात लवकर मार्गाचे काम करून समस्या सोडवावी, असे सांगितले आहे.

-सुरेश काळबांडे, अध्यक्ष, डिगडोह भाजप मंडळ.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com