Yashomati Thakur News : आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगितली राज्य सरकारची चित्तरकथा !

Amaravati : जून महिन्याचा शेवट आला असताना नवे धोरण लागू झाले नाही.
Yashomati Thakur
Yashomati ThakurSarkarnama
Published on
Updated on

MLA Yashomati Thakur strongly criticized the state government : दगाबाजी करून सत्तेवर आलेले लोक आमचे सरकार गतिमान असल्याचा दावा करतात. पण गतीने कामे करणे तर दूरच कामांची यापूर्वी असलेली गतीही कमी झाली आहे, असे म्हणत माजी मंत्री आणि अमरावती जिल्ह्यातील तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला. (MLA Yashomati Thakur strongly attacked the state government)

सर्वसामान्यांना एक मेपासून ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध करून देणार, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र जून महिन्याचा शेवट आला असताना नवे धोरण लागू झाले नाही. तर नागरिकांना चक्क सात ते आठ हजार रुपये ब्रासप्रमाणे महागडी वाळू खरेदी करावी लागत आहे.

सरकारच्या नव्या स्वस्त वाळू धोरणाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेल्याचा हल्लाबोल आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. नव्या स्वस्त वाळू धोरणावरून सरकारला धारेवर धरताना त्या म्हणाल्या की हे कसलं गतिमान सरकार आहे. ही तर सर्वसामान्यांची क्रूर थट्टा आहे. एक मे तर सोडा जून महिना संपत आला तरी धोरणाचा कुठेच थांगपत्ता नाही.

सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका नागरिकांना बसतो आहे. एकीकडे महागड्या वाळूमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे घर बांधण्याचे स्वप्न मृगजळ ठरले आहे. दुसरीकडे मात्र खोके सरकारमध्ये काही जण मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. अंतर्गत लाथाळ्या सुरू आहेत, त्यामुळे या सरकारचे पितळ उघडे पडले असून, हेच का गतिमान सरकार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Yashomati Thakur
Yashomati Thakur on Contractor: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची यशोमती ठाकूरांनी केली पोलखोल, कंत्राटदारालाही झापलं...

अमरावती (Amravati) जिल्ह्यात दरवर्षी जानेवारी महिन्यात वाळू घाटाचा लिलाव होतो, यावर्षी मात्र मार्च महिन्यात ही प्रक्रिया सुरू झाली, ती थांबवून नव्या धोरणानुसार वाळू देण्याचे गाजर दाखवण्यात आले. बांधकामाचा, वाळू उपसण्याचा हंगाम संपला तरीही नवे वाळू धोरण राबविण्याची सरकारची (State Government) चित्तरकथा सुरूच आहे, अशीही टीका त्यांनी केली. तर हा प्रश्न आपण सभागृहात उपस्थित करून सरकारला याचा जाब विचारणार असल्याचे देखील आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com