मनसे-भाजप नेते Bharat Jodo Yatra मध्ये सहभागी होणार?

Bharat Jodo Yatra|भारत जोडो यात्रेमुळे विरोधकांचेही मतपरिवर्तन नक्कीच होईल.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo YatraTwitter/@INCMaharashtra
Published on
Updated on

Bharat Jodo Yatra नागपूर : जे लोक आज या यात्रेला विरोध करत आहेत, भारत जोडो यात्रेमुळे (Bharat jodo Yatra) त्यांचे मतपरिवर्तन नक्कीच होईल, असे मत माजी मंत्री आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी व्यक्त केले.

भारत जोडो यात्रेमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथून आज सकाळी 5 वाजता त्यांनी पायी चालण्याला सुरुवात केली. भारत जोडो यात्रेला विरोध करणारे स्वतःसुद्धा या यात्रेत सहभागी होतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकांना या यात्रेमध्ये सामील होण्याचे मी मनापासून निमंत्रण देतो. त्यांनी या यात्रेमध्ये आलं पाहिजे अशी त्यांना विनंती आहे.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींसाठी काय पण.., राजकीय लाभाचे पद नसतानाही शेतकऱ्याचे असेही प्रेम !

या यात्रेमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर युवकांमध्ये महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. संपूर्ण भारत देशाला एका धाग्यात जोडणारी ही यात्रा आहे. भारता ला जगात तिसरी महाशक्ती बनविण्याच्या दृष्टीने या यात्रेमधून राहुल गांधी यांनी पाऊल टाकले आहे. त्यांच्यासोबत लाखो पावले या यात्रेत देशभर चालत आहेत. त्यामुळे भविष्यात भारताला तिसरी महाशक्ती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे आमदार सुनील केदार 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले.

अकोला जिल्ह्यातील रापटा येथून आज सकाळी 6 वाजता यात्रेला सुरुवात झाली. यात्रेचा आज देशातील 72वां, महाराष्ट्रातला 12 वा आणि विदर्भातील चौथा दिवस आहे. आता यापुढे बाळापूर मार्गे ही यात्रा संत गजानन महाराज यांच्या शेगाव नगरीत जाणार आहे. तेथे सायंकाळी भव्य जाहीर सभा होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विषय आणि त्यानंतर मनसेने काळे झेंडे दाखवण्याची घेतलेली भूमिका, यावर राहुल गांधी काय बोलणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांनी या सभेसाठी जय्यत तयारी केली आहे. काल सकाळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह राज्यातील नेत्यांनी शेगाव येथे जाऊन तयारीचा आढावा घेतला होता. आजही काही काँग्रेस नेते तयारीसाठी शेगावला पोहोचलेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com