MNS : बाबा रामदेव विरोधात पतंजली स्टोअरसमोर मनसेची घोषणाबाजी...

ठाणे येथील, योग शिबिरामध्ये योगगुरू रामदेव बाबांनी महिलांबाबत बेताल व्यक्तव्य केले. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) शहराध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे यांच्यासह महिला सेनेच्या मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
MNS Nagpur
MNS NagpurSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : ठाणे येथील, योग शिबिरामध्ये योगगुरू रामदेव बाबांनी महिलांबाबत बेताल व्यक्तव्य केले. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) शहराध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे यांच्यासह महिला सेनेच्या मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. बाबा रामदेव यांच्या विरोधात मनसैनिकांनी घोषणा दिल्या.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा वाद सुरू असतानाच आता बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी हे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. महिला साडी, सलवार सूटमध्ये तर चांगल्या दिसतातच. पण माझ्यासारखे त्यांनी काही नाही घातले तरी त्या छान दिसतात, असे वक्तव्य त्यांनी केले. ठाण्यातील हायलँड मैदानात रामदेव बाबा यांनी योगाचे धडे दिले. यावेळीच त्यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

आज दुपारी १.०० सक्करदरा पोलीस स्टेशनच्या बाजूला पतंजली स्टोअरच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. बाबा रामदेव यांच्या विरोधात नारेबाजी करताना मनसैनिक आक्रमक झाले होते. काहींनी बाबा रामदेव यांच्या बॅनरवर शाई फेकण्याचाही प्रयत्न केला. ‘महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात," असे वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी नुकतेच ठाण्यात केले होत. या विधानानंतर बाबा रामदेव यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

आपण केलेल्या विधानामुळे महिलांची प्रतिष्ठा आणि सन्मान दुखावला गेला आहे, समाजमाध्यमांवर आपल्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आपल्या विरोधात याबाबत तक्रारी आल्या आहेत, याबाबत आपण तीन दिवसांत स्पष्टीकरण द्यावे, असे महिला आयोगाने बाबा रामदेव यांना पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटलं आहे. बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या या विधानाची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे.

MNS Nagpur
Amol Mitkari News: '' कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा...?''

ठाण्यात पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान तर्फे शुक्रवारी मोफत योग शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी दीपाली सय्यद, आमदार रवी राणा यांनीही मंचावर हजेरी लावली. येथे केलेल्या वक्तव्यानंतर रामदेव बाबांचा सर्वत्र निषेध केला जात आहे. आज आम आदमी पार्टी नागपूर महिला विंगतर्फेसुद्ध रामदेव बाबांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com