Cricketnama 2023 : नागपुरात राज ठाकरेंचे शिलेदार शिंदेबरोबर दोन हात करणार!

MNS Team In Nagpur For Cricketnama : क्रिकेटनामाच्या मैदानात रंगणार 'मनसे'चा थरार
MNS
MNSSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News :  पद्मभूषण डॅा. बाळासाहेब विखे -पाटील क्रीडानगरी, (नागपूर) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटनामात 'मनसे'चा थरार रंगणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) (मनसे) अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे. या संघाचे नेतृत्व मनेसे नेते अविनाश जाधव, नागपूरचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्याकडे असणार आहे.

हिवाळी अधिवेशनात राजकीय आरोप-प्रत्यारोपाने वातावरण जोरदार तापत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा अपुरा हमीभाव, कापसाला न मिळणारा भाव, विदर्भातील प्रश्नांकडे सतत राज्य सरकारकडून होणारे दुर्लक्ष यासर्व प्रश्नांवरून विधानसभा तसेच विधानपरिषदेच्या सभागृहात अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MNS
Cricketnama 2023 : शंभूराज देसाई चौकार, षटकारातून मुख्यमंत्री शिंदेंची ताकद वाढवणार...

सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असताना अनेक महत्वपूर्ण विषयांचे प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर मांडून त्यावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांकडून केली जात आहे. तसेच, महत्वाच्या प्रश्नांकडे फारसे गांर्भियाने न पाहता, केवळ आश्वासनांची खैरात सत्ताधारी पक्ष असलेल्या शिंदे-फडणवीस(Devendra Fadanvis) आणि अजित पवार गटाकडून केली जात आहे, असा आरोपही केला जात आहे.

सकाळ माध्यम समूहातील ‘सरकारनामा’या वेबपोर्टलच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘क्रिकेटनामा’स्पर्धेच्या दुसऱ्या सीझनचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे. सोमवार ( 11 डिसेंबर) व मंगळवार (12 डिसेंबर) रोजी ही स्पर्धा घेतली जाणार असून नागपूर शहरातील मेकोसाबाग भागातील शालोम स्पोर्टस् ग्राउंड येथे ही स्पर्धा होणार आहे. पद्मभूषण डॅा. बाळासाहेब विखे -पाटील क्रीडानगरी असे याचे नामकरण करण्यात आले आहे.

राज्याचे महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते सोमवारी या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या आगळ्या वेगळ्या स्पर्धेमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना, शिंदे गट, मनसे, तसेच नागपूर महापालिका वॅारिअर,असे संघ सहभागी होत आपल्या खेळाची चुणूक दाखविणार आहेत.

MNS
Cricketnama 2023 : नागपूर अधिवेशनात 'क्रिकेटनामा'चा ज्वर...

दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्यावरून मुंबईत खळखट्याक सुरू करणारी मनसेची टीम आता क्रिकेटनामासाठी नागपूरमध्ये दाखल झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या संघामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये चौकार, षटकारांची फटकेबाजी करत प्रतिस्पर्धी खेळाडूंना क्लिन बोल्ड करण्याची रणनीती दोन्ही संघातील खेळाडूंनी आखली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com