महाविकासच्या राज्यात विकास शुल्क घेऊन एनआयटीची मोगलाई...

आता नागरिकांना विकासाचा आर्थिक भार देणे योग्य नाही. नागपूर सुधार प्रन्यासने हे शुल्क नागरिकांकडून न आकारता या भागाचा विकास करावा अशी मागणी आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात नागरिकांची लूट केली जात आहे. नागपूर शहरातील हुडकेश्‍वर-नरसाळा हा भाग देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मी पालकमंत्री असताना शहरात समाविष्ट करून घेतला होता. तेव्हा आमच्या सरकारने ३५० कोटी रुपयांपेक्षा अधिकची कामे या परिसरात केली. पण एक रुपयाही विकास शुल्क नागरिकांकडून घेतला नाही.

आता महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) लोकांकडून विकास शुल्क आकारत आहे. हुडकेश्वर-नरसाळा भागातील नागरिकांकडून वसूल करण्यात येत असलेल्या विकास शुल्काला शहराचे माजी पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विरोध दर्शविला आहे. या विषयावर नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यासचे सभापती आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हुडकेश्वर-नरसाळा भागाच्या विकासासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडून प्रती चौरस फूट ५६ रुपयांचे विकास शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु असे कुठलेही शुल्कच घेण्याची गरज नसून हा मोघलशाही निर्णय मागे घेण्याची मागणी माजी पालकमंत्री आमदार बावनकुळे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात शहराचा पालकमंत्री या नात्याने मी हुडकेश्वर-नरसाळा भागाचा नागपूर महानगर पालिकेत समावेश करवून घेतला.

Chandrashekhar Bawankule
Video: नागपूरातील पाणी प्रश्नावर भाजप संतप्त; चंद्रशेखर बावनकुळे

येथील विकासासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून ३५० कोटींहून अधिकचा निधी खर्च केला. त्यामुळे आता नागरिकांना विकासाचा आर्थिक भार देणे योग्य नाही. नागपूर सुधार प्रन्यासने हे शुल्क नागरिकांकडून न आकारता या भागाचा विकास करावा अशी मागणी आमदार बावनकुळे यांनी केली. या बैठकीला आमदार टेकचंद सावरकर, अजय बोढारे, भगवान मेंढे, डॉ. प्रिती मानमोडे, स्वाती आखतकर, लिला हातीबेड, विद्या मडावी, पुजा धांडे, चंदुभाऊ आखतकर, मनोज लक्षणे, कपिल आदमने, योगेश मडावी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com